ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 14 - मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका मध्यरात्रीपासून बंद झाला आहे. देखभालीचा खर्च वसूल झाल्याने हा टोलनाका बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी आता सुरु झाली आहे. टोलनाका बंद झाल्याने वाहनचालकांनी यावर आनंद व्यक्त केला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्याची उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्याने हा टोलनाका बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी आता सुरु झाली आहे. आय़आरबी कंपनीला 180 कोटी रुपये वसूल करायचे होते. प्रत्यक्षात कंपनीनं यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं टोलवसुली केल्याचं सांगत सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी टोलनाका बंद करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश मिळालं आहे.
मुंबईहून नाशिककडे जाताना ठाण्यानंतर लागणारा पहिला टोल नाका म्हणजे भिवंडी बायपासवरील खारेगावचा टोल नाका. येथून दिवसाला हजारो वाहने ये-जा करतात. त्यातून आयआरबी कंपनीला दिवसाला लाखो रुपयांचा टोल मिळतो. 1998 साली हा टोल नाका उभारण्यात आला होता. तेव्हापासून रस्त्याची उभारणी आणि देखभालीच्या खर्चापोटी 180 कोटी रुपये कंपनीला वसूल करायचे होते.
आय़आरबीने हा टोलनाका बंद करण्याचा निर्णय मध्यरात्रीपासून घेतला.
चालकांना दिलासा-
खारेगाव हा राज्यातील पहिलाच टोल नाका आहे. टोलवसुली बंद झाल्यामुळे 13 मे पासून वाहनचालकांना टोल भरण्याची गरज नाही, त्यामुळे प्रवाशांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 1998 साली राज्यातील हा टोल नाका सर्वप्रथम उभारण्यात आला होता.