पनवेल : पनवेल-सायन महामार्गावर खारघर येथे स्थानिकांकडून टोल आकारू नये, याकरिता काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाला चक्क राष्ट्रवादीने साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर्सवर तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी आयोजक असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते. त्यामुळे टोलविरोधी आंदोलनाची धार आणखी वाढल्याचे मत काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.
पनवेल-सायन महामार्गाचे रुंदीकरण करीत असताना पनवेल परिसरातील वाहनांकरिता पर्यायी रस्ता देण्याचे काम संबंधित विभागाकडून होणो गरजेचे होते. मात्र तसे न करता स्थानिकांवर टोलचा भरुदड लादण्याचा घाट सा. बां. विभाग आणि ठेकेदाराने घातला आहे. यासंदर्भात आ. प्रशांत ठाकूर यांनी सर्वप्रथम आवाज उठवला असून त्यानंतर विविध पक्षांनी या टोल नाक्याला विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट घेतली. संबंधित नाक्यातून एमएच 46 आणि क्6 या वाहनांना सूट देण्याची मागणी केली आहे. जर याबाबत योग्य निर्णय झाला नाही तर आम्हाला जनतेसाठी आंदोलन करावे लागेलच असा इशारा आ. प्रशांत ठाकूर यांनी दिला. या आशयाचे निवेदनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले आहे.
त्यानुसार लागलीच मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि अधिका:यांसोबत 1क् जुलै रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. जोर्पयत टोलबंद होत नाही तोर्पयत आंदोलन करण्याचा इशारा प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे. दरम्यान यासंदर्भात पनवेल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन सादर करण्यात आले होते. (वार्ताहर)
4आघाडीच्या दोनही स्थानिक नेत्यांनी टोलला विरोध दर्शवला आहे. एक दोन दिवसापूर्वी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र प्रय} करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र आले आहेत. दोनही पक्षाच्या वतीने संयुक्त बॅनर्स छापून ते ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. एमएच 46 आणि क्6 या वाहनांना टोलमधून सूट द्या अशी मागणी करणारे बॅनर्स दृष्टिक्षेपास पडताहेत.
4आयोजकांमध्ये पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भीमसेन माळी यांची नावे लिहिण्यात आली आहेत.
1रायगडात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये इतके सख्य नाही मात्र लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून दोनही पक्षाचे मनोमिलन झाले आहे. आपल्याला एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही हे दोनही पक्षातील नेते ओळखून चुकले आहेत. त्यामुळे एखादा जनतेच्या जिव्हाळय़ाचा विषय घेवून एकत्रित लढा देण्यासाठी दोनही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांच्या हातात हात घातला आहे.
2खारघर टोल नाक्याच्या प्रश्नाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रितरीत्या रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी टोल विरोधातील आंदोलनाचे बळ आणखी वाढले असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिली.