शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
2
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
3
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
4
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
5
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
6
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
7
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
8
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
9
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
10
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
11
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
12
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
13
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
14
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
15
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
16
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
17
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
18
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
19
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
20
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 

वाशिममध्ये शौचालय नसलेल्या कुटूंबाच्या घरावर ‘खतरा’

By admin | Published: August 26, 2016 6:03 PM

जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या कुटुबांच्या घरावर खतरा (लालस्टीकर) लावण्याच्या अभिनव अभियानाला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने

ऑनलाइन लोकमत
 
वाशिम, दि.26 -  जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या कुटुबांच्या घरावर खतरा (लालस्टीकर) लावण्याच्या अभिनव अभियानाला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कुटुंबस्तर संवाद अभियानांतर्गत २६ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मंगरुळपीर तालुक्यातील नांदगाव  या गावातील कुटुंबांना भेटी दिल्या आणि शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांनी लाल स्टिकर (खतरा/धोका) लाऊन शौचायल बांधण्याची विनंती केली. 
 गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनने एक अनोखा उपक्रम सुरू केला असून, शौचालय नसलेल्या कुटुंबांना ग्रामपंचायतीचा कोणताही दाखला देताना त्यावर लाल शिक्का मारण्याचा , तसेच  त्या दाखल्यावर विना शौचालय असे लिहिण्याचा निर्णय जि.प.च्यावतीने घेण्यात आला होता. या अंतर्गत घरोघरी शौचालय बांधकाम करून त्याचा वापर करण्यासंदर्भात वाशिम जिल्हा परिषदेने जनजागृतीची मोहिमही सुरू केली.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी ही संकल्पना सांगितली होती.या उपक्रमांतर्गत स्वच्छता कक्षाने दोन प्रकारचे शिक्के बनविले. ज्यांच्याकडे वापरातील शौचालय आहे त्यांच्या घरावर हिरव्या रंगातील शौचालयासह व ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही व जे
कुटुंब उघड्यावर शौचास जातात त्यांच्या कागदपत्रांवर लाल रंगातील शिक्का मारण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील ४९१  ग्रामपंचायतींना अशा प्रत्येकी दोन शिक्क्यांचे व एका पॅडचे वितरणही करण्यात आले आणि याबाबत सर्व गटविकास अधिका-यांना सूचनाही दिल्यानंतर त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. आता जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनच्या वतीने २२ आॅगस्ट पासून जिल्हाभर भेटी गाठी- स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. येणाºया २ आॅक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील ३५ हजार कुटुंबांना भेटी देण्यात येणार आहेत. या मोहिमेला जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी चांगली गती दिली असून, प्रत्यक्ष गावात जाऊन घरोघरी शौचालय बांधायचे आवाहन ते करीत आहेत. याच अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील नांदगाव येथील कुटुंबस्तर संवादासाठी घेतलेल्या भेटीदरम्यान जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी  शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरावर खतरा लिहिलेले (विना शौचालय) लाल स्टीकर लावण्याची मोहिमही राबविली.