शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

खिद्रापुरेची पत्नी ताब्यात; रुग्णालयावर छापा

By admin | Published: March 10, 2017 1:35 AM

म्हैसाळ (ता. मिरज) भ्रूण हत्याकांडातील अटकेत असलेला मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याची पत्नी डॉ. मनीषा हिला गुरुवारी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सांगली/मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) भ्रूण हत्याकांडातील अटकेत असलेला मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याची पत्नी डॉ. मनीषा हिला गुरुवारी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी खिद्रापुरेच्या घरावर छापा टाकून दोन तास कसून तपासणी केली. मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे यांचा गर्भपात करण्यासाठी वापरलेली गोळ्या व इंजेक्शन खिद्रापुरेने लपवून ठेवले होते, ते जप्त केले आहे. दरम्यान बुधवारी अटक केलेला विजापूरचा डॉ. रमेश देवगीकर व औषधांचा पुरवठा करणारा सुनील खेडकर यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.सध्या खिद्रापुरेची कसून चौकशी सुरु आहे. स्वाती जमदाडे यांचा गर्भपात करण्यासाठी एक औषधी गोळी व इंजेक्शन दिले होते. इंजेक्शन निम्मेच वापरले होते. स्वातीचा मृत्यू झाल्याचे समजताच निम्मे इंजेक्शन व गोळ्यांचे पाकीट लपवून ठेवले आहे, अशी कबुली त्याने दिली होती. त्यानुसार हे इंजेक्शन व पाकिटातील शिल्लक एक गोळी पोलिसांनी जप्त केली.खिद्रापुरेची पत्नी डॉ. मनीषा हिचीही कसून चौकशी सुरु आहे. पण अवैध गर्भपातासाठी पतीला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही, असे ती सांगत आहे. तरीही तपासात निष्पन्न झालेल्या विविध मुद्यांवरुन तिलाही अटक होण्याची शक्यता आहे. गर्भपाताच्या व्यवसायात खिद्रापुरेने मोठी कमाई केल्याचा संशय असून, त्याच्या मालमत्तेची व बँक खात्यांची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पाचजणांची वैद्यकीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीची अहवाल सादर झाला आहे. खिद्रापुरेने काही पुरावे नष्ट केले आहेत. तपासातून जी काही माहिती पुढे येईल, त्यानुसार कारवाई केली जात आहे. - दत्तात्रय शिंदे, जिल्हा पोलिसप्रमुख, सांगलीडॉ. खिद्रापुरे विजापूर येथील आणखी एका डॉक्टरकडे गर्भलिंग निदान चाचणी करुन घेत होता. या डॉक्टरला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक विजापूरला रवाना झाले आहे. खिद्रापुरेला गर्भपातासाठी रूग्ण आणून देणाऱ्या तेरदाळ येथील एका एजंटाचे नावही पुढे आले आहे. येत्या एक-दोन दिवसात आणखी काहीजणांना अटक होण्याचे संकेत आहेत.