ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि २६ - आम्ही निर्दोष आहोत हा जो प्रयत्न सुरु आहे तो माझ्या कुटुंबवर दबाव आणन्याचा आणि बदनाम करण्याचा एक प्रयत्न आहे. यामधून काहीही साध्य होणार नाही. खोदा पहाड निकला चुहा होता है, यहां चुहा भी नही निकलेगा, देख लेना असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. ते एका पत्रकार परिषदेत बालत होते.
पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेले आरोपपत्र भुजबळ कुटुंबीयांना केवळ त्रास देण्यासाठीच आहे.आम्ही चौकशीला सामोर जात आहे. आमच्यावर जे आरोपपत्र दाखल केले आहे ते फक्त सुडापोठी यामागचा उद्देश हा फक्त आम्हाला त्रास देणे ऐवढाच आहे. काही दिवसात तुम्ही पाहलच सर्व आरोपातून आमची निर्दोश सुटका होईल
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी बुधवारी छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, तर काल (गुरुवारी) नवी मुंबईच्या ‘हेक्स वर्ल्ड’ घोटाळाप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी समीर आणि पंकज यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.
आता कलिना विद्यापीठातील राज्य सरकारच्या सेंट्रल लायब्ररीप्रकरणी एका महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती, गुरुवारी एसीबीने न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाला दिली आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबियाचा पाय अजुन खोलत जात असल्याचं दिसते आहे.
कलिना विद्यापीठाचा भूखंड हडप केल्याची केस गंभीर असून, याचा संपूर्ण तपास करण्यासाठी व भुजबळ आणि कुटुंबीयांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल, अशी माहिती एसीबीच्या वकिलांनी खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने एसीबीला एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.
दरम्यान, एसीबीच्या म्हणण्यानुसार, संबंधित भूखंड मुंबई विद्यापीठाचा होता. मात्र, या भूखंडावर लायब्ररी बांधण्याचे कंत्राट खासगी विकासकाला देण्यात आले. यासाठी भुजबळ यांना मोठ्या रकमेची लाच देण्यात आली.