मुंबई : भाजपाच्या वाईट काळात आम्ही त्यांना साथ दिली. मात्र आता अच्छे दिन आले म्हटल्यावर त्यांनी आपल्या गेल्या 25 वर्षाच्या मित्रची साथ सोडली. साथ देणा:यांना लाथ देणा:या अशा लोकांवर तुम्ही विश्वास कसा ठेवणार, असा भावनिक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केला.
शिवसेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित न करता प्रथमच बोरीवली येथे आयोजित केला होता. तत्पूर्वी शिवाजी पार्क येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन करण्यात आले. ठाकरे म्हणाले की, आम्ही भाजपाला साथ दिली, परंतु त्यांनी आम्हाला लाथ मारली. भाजपाचे हे युती तोडणो महाराष्ट्रातील हिंदूंना आवडलेले नाही. त्यामुळेच अनेक जण भेटून भाजपाच्या या कृतीबद्दल नाराजी प्रकट आहेत.
मुंबईतील गुजराती, जैन व मारवाडी समाजाने शिवसेनेखेरीज मुंबईचा विचार करून पाहावे; कारण जेव्हा तुमच्यावर संकट आले तेव्हा ही शिवसेना तुमच्या पाठीशी उभी राहिली होती, असे ठाकरे म्हणाले. माङयासमोर बसलेला शिवसैनिक हीच माझी शस्त्रे आहेत, नागरिकांच्या मनातील संताप हेच भांडवल आहे, असे नमूद करून ठाकरे म्हणाले की, आम्ही रिजनल पार्टी असलो तरी ओरिजनल आहोत. त्यामुळे राज्यात आमचीच सत्ता येईल. त्यानंतर आघाडीच्या घोटाळ्य़ांची चौकशी करू. 2क्2क् चा भारत युवकांचा असेल असे पंतप्रधान सांगतात आणि आदित्य ठाकरे यांना चर्चेला पाठवले तर अहंकार दुखवतो ही दुटप्पी भूमिका आहे, असेही ठाकरे म्हणाले.(प्रतिनिधी)