भाऊसाहेब येवले, राहुरी (अहमदनगर)देशात नावलौकीक असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ऊस बेणे निकृष्ट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उंदराने खाल्लेले, निकृष्ट डोळ््याचे, कोंबावर कापट असलेले बेणे विद्यापीठ सर्रास लागवड करत असल्याचे आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे.नगर-मनमाड राज्यमार्गावर धरमडीच्या पश्चिम बाजूला विद्यापीठाने ऊस लागवड सुरू केली आहे़ प्रस्तुत ‘लोकमत’ प्रतिनिधीने तेथे केलेल्या पाहणीत हा धक्कादायक प्रकार आढळून आला. विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने नवीन को-१०००१ उसाचा वाण प्रसारित केला आहे. मात्र लागवड करताना या वाणाची काळजी घेतली न गेल्याचे दिसून आले. लागवड करताना हे बेणे चक्क उंदराने कुरतडलेले होते. शिवाय काही बेणे निकृष्ट डोळ््याचे, कोंबावर कापट असलेले होते. विद्यापीठाच्या कंत्राटी मजुरांकडून उसाची लागवड केली जात आहे़ लागवडीपूर्वी बेणे द्रावणात बुडून घेण्याची विद्यापीठाची शिफारस असताना प्रत्यक्षात मात्र बेण्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया होत नसल्याचे आढळून आले आहे़लागवड सुरू असलेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर विद्यापीठाचा वॉटर मॅनेजमेंट प्रकल्प आहे़ मात्र उसाची लागवड करताना विद्यापीठ ठिबक पद्धतीचा अवलंब करीत नसल्याचे आढळून आले़ ज्या विद्यापीठाचेवाण, बियाणे लागवडीसाठी शेतकरी तुटून पडतात, त्या विद्यापीठाकडूनच असा प्रकार समोर आला आहे.
ऊस बेण्यालाच लागली ‘कीड’
By admin | Published: January 02, 2017 5:26 AM