श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : वांगदरी येथील एका टोळीने अपहरण केलेल्या शीतल संजय चव्हाणच्या आई वडिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी शीतल आईच्या कुशीत असेल. अपहरण करणाऱ्या टोळीने शीतलला सळईने चटके देऊन छळ केल्याची माहिती पुढे आली आहे़.शीतलच्या आई, वडिलांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील इंदूपूर (देवरिया) आहे़ ते कामानिमित्त पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात राहत होते़ एका बिल्डरकडे चव्हाण दाम्पत्य काम करत होते़ त्यांना तीन मुली आहेत़ शीतल बोईसर रेल्वे स्टेशनवर खेळत गेली असताना १६ जून रोजी वांगदरी (ता़ श्रीगोंदा) येथील टोळीने तिचे अपहरण केले होते.शीतलचे अपहरण झाल्यापासून तिच्या आईने अन्नत्याग केला होता़ २२ जूनला वांगदरीमधील युवकांना आपल्या गावात तीन अनोळखी मुली एका टोळीने पकडून आणल्याचे समजले. त्यापैकी एक मुलगी आणि दोन आरोपींना त्यांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले़ पण टोळीतील एक महिला दोन मुलींना घेऊन पळून गेली़.
अपहरण झालेली शीतल आज आईला भेटणार
By admin | Published: June 27, 2017 1:36 AM