शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

नागपुरातील युवतीचे अपहरण

By admin | Published: January 07, 2017 2:50 AM

अकोल्यात सुटका; लहान मुलींना घेऊन महिलेचा पळ.

सचिन राऊत अकोला, दि. ६- नागपूरमधील मोमीनपुरा येथील एका खासगी रुग्णालयात कामावर असलेल्या युवतीला येथीलच दीपक नामक युवकाने प्रेमाच्या जाळय़ात ओढून तिचे एका बुर खाधारी महिलेच्या साहाय्याने तीन दिवसांपूर्वी नागपुरातून अपहरण केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री समोर आली. सदर युवतीला शुक्रवारी रात्री गुंगीचे औषध देऊन शेगाव रेल्वे स्टेशनवरून हैद्राबाद येथे नेण्यात येत असतानाच हा अपहरणाचा डाव उघड झाला. या प्रकरणी युवती बेपत्ता असल्याची तक्रारही नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे.नागपूर येथील रहिवासी असलेल्या या २१ वर्षीय युवती नागपूरमधीलच मोमीनपुरा येथील रहिवासी डॉ. खान यांच्या हॉस्पिटलमध्ये कामावर आहे. या युवतीला दीपक नामक युवकाने प्रेमाच्या जाळय़ात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवून पळून जाण्यासाठी प्रवृत्त केले. युवतीनेही दीपकच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवत ती त्याच्यासोबत जाण्यासाठी घरून निघून आली. युवती घरून निघाल्यानंतर दीपकने तिच्या भ्रमनध्वनीवर फोन करून नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका ठिकाणी येण्याचे सांगितले. त्यानुसार युवती ठरलेल्या ठिकाणावर पोहोचली; मात्र सदर ठिकाणावर दीपक उपस्थित नसल्याने तिने त्याच्याशी संपर्क केला; मात्र दीपकने सदर ठिकाणावर येण्यास नकार देत तिला काळय़ा रंगाच्या बुरख्यामध्ये बाजूलाच असलेल्या महिलेला भेटण्याचे सांगितले. युवती महिलेला भेटताच तिने दीपकची ओळख दाखवित तिला बाजूलाच एका ठिकाणी नेऊन गुंगीचे औषध दिले. त्यानंतर सदर युवती शुद्धीवर येण्याआधीच तिला अकोल्यातील एका ठिकाणी दोन दिवस ठेवण्यात आले. शुक्रवारी युवतीला हैद्राबाद येथे नेण्याची पूर्ण तयारी करण्यात आली. बुरखाधारी महिला, अपहृत युवती आणि आणखी लहान मुलगी शेगाव रेल्वे स्टेशनवर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांची विचारपूस केली. यामधील युवतीला गुंगीचे औषध दिले असल्याने ती स्पष्ट बोलत नव्हती तसेच बुरख्यातील युवती मराठी बोलत असल्याने त्यांना संशय आला. या ठिकाणी पोलिसांना बोलावताच बुरखाधारी महिला शौचास जात असल्याचे कारण सांगून लहान मुलीला घेऊन पळून गेली. त्यानंतर अपहृत युवतीला अकोल्यात आणण्यात आले. जीआरपी पोलिसांसमोर तिला हजर करण्यात आल्यानंतर युवतीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. मुलीवर शस्त्रक्रिया झाल्याचा संशय!नागपुरातून अपहरण झालेल्या युवतीने पोलिसांसमोर बुरखाधारी महिलेने एका लहान मुलीला सोबत आणल्याचे सांगितले. सदर मुलीच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ितच्या गुप्त भागामध्ये नळीही टाकली असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. लहान मुलगी नागपुरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल होती; मात्र तिच्यावर अर्धवट उपचार करूनच तिला अकोल्यात आणण्यात आले. गुरुवारी लहान मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला अकोल्यातील रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शेगावला रवाना झाल्याचे सदर युवतीने सांगीतले.मोठय़ा रॅकेटची शक्यतामुलीच्या पोटावर शस्त्रक्रियेचे टाके असल्याने तसेच गुप्तांगात नळी निघाल्याने या मुलीच्या शरीरातील काही भाग काढल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एका मुलीची प्रकृती ठीक नसताना आणि दुसर्‍या युवतीचे अपहरण करून त्यांना हैदराबाद येथे नेण्याची तयारी सुरू असल्याने यामध्ये मोठे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लहान मुलीवर किडनीसंदर्भात उपचार करण्यात येत असल्याचे अपहृत युवतीने शुक्रवारी पोलिसांना सांगितले, असून या दिशेने पोलिसांनी तपास करण्याची गरज आहे.संभाजी ब्रिगेडचा पुढाकारसंभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते शेगाव रेल्वेस्थानकावर होते. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी महानगराध्यक्ष पवन महल्ले यांना माहिती दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी युवतीची सुटका केली. यावेळी अमोल इंगोले, राहुल लोहिया, सागर तिवारी, कैलास पवार, संदीप बाथो यांनी प्रयत्न केले.युवतीला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. ती नागपुरातून बेपत्ता झाल्याची माहिती आहे. तिला ताब्यात घेऊन नागपूरमधील तीच्या कुटुबीयांशी संपर्क साधला असून तिचे भावंडं तिला घेण्यासाठी येणार आहेत. शेगावमध्ये घडलेला प्रकार तसेच पळून गेलेल्या महिलेविषयी चौकशी करण्यात येत आहे.- सॅम्युअल वानखडेपोलीस निरीक्षक, जीआरपी पोलीस, अकोला.