गिरीश गोरेगावकर / लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव तालुक्यातील घरोशी येथील शिवसेनेच्या माजी तालुका संघटक योगिता यशवंत मोरे यांनी आपल्या एक किडनीचे दान करून जावयाला जीवदान दिले आहे. या शस्त्रक्रियेसाठी त्यांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दोन लाख रु पये अर्थसाहाय्य प्राप्त झाले. राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रात अशाप्रकारे परोपकाराची भावना जोपासल्याबद्दल योगीता मोरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.योगीता यशवंत मोरे यांचे जावई बळीराम शंकर दळवी यांची एक किडनी निकामी झालाी होती. त्यामुळे शारीरिक व्याधीने ते त्रस्त झाले होते. त्यांना किडनीची अत्यंत गरज होती. मात्र, परिस्थिती गरिबीची असल्यामुळे ते हतबल झाले होते.अखेर त्यांच्या सासूने जावयाला स्वत:ची किडनी दान देण्याचे ठरविले. सर्व तपासण्या करून २४ आॅक्टोबरला मुंबई सेंट्रल येथील एका खाजगी रूग्णालयात दोघांवर यशस्वी शस्त्रक्रि या करण्यात आली.सासूच्या दानशूर वृत्तीमुळे जावई दळवी यांना जीवनदान मिळाले. या शस्त्रक्रि येसाठी एकूण दहा लाखांचा खर्च झाला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या साहाय्यता निधीतून दोन लाख रु पये अर्थसाहाय्य केले आहे. त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
किडनी देऊन जावयाला जीवदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 4:39 AM