शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...

By राजकुमार जोंधळे | Published: September 29, 2024 8:09 PM

Killari Earthquake: ३० सप्टेंबर २०२४ राेजी किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला ३१ वर्ष पूर्ण हाेत आहेत. मात्र, आजही ‘किल्लारी’च्या आठवणी जाग्या आहेत. दरवर्षी गणेशाेत्सव काळात याची प्रकर्षाने जाणिव हाेते. गत ३१ वर्षात मराठवाड्यासह परिसराला तब्बल १२५ भूकंपाचे धक्के बसले आहेत. दरवर्षी किल्लारीत ‘ब्लॅक-डे’ म्हणून पाळला जाताे.

- राजकुमार जाेंधळेलातूर -  ३० सप्टेंबर २०२४ राेजी किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला ३१ वर्ष पूर्ण हाेत आहेत. मात्र, आजही ‘किल्लारी’च्या आठवणी जाग्या आहेत. दरवर्षी गणेशाेत्सव काळात याची प्रकर्षाने जाणिव हाेते. गत ३१ वर्षात मराठवाड्यासह परिसराला तब्बल १२५ भूकंपाचे धक्के बसले आहेत. दरवर्षी किल्लारीत ‘ब्लॅक-डे’ म्हणून पाळला जाताे.

सन २०१८ ते २०२४ या सहा वर्षाच्या काळात मराठवाड्यातील काही गावात भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाण वाढले आहे. काही गावांना साैम्य धक्के जाणवले. गत ३१ वर्षात मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगेाली जिल्ह्याला १२५ धक्के बसले आहेत. सप्टेंबर महिना उजाडला की महाप्रलयंकारी भूकंपाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या हाेतात.

१९९९ मध्ये बसले किल्लारीला ११ धक्के...सप्टेंबर १९९३ ते सप्टेंबर २०२४ या काळात लातूर परिसराला भूकंपाचे ४८ धक्के बसले. १९९९ मध्ये किल्लारीला ११ धक्के जाणवले. लातूर, धाराशिव, किल्लारी, लाेहारा, उमगरा, सास्तूर-माकणीला सर्वाधिक धक्के बसले. १३ सप्टेंबर २०२८ राेजी ३.९ रिश्टर स्केलचा धक्का, २१ डिसेंबर २०२१ राेजी ३.९ आणि २.७ रिश्टर स्केलचे धक्के बसले. तर ७ ते २३ सप्टेंबर २०२२ मध्ये तीन साैन्य धक्के जाणवले.

२०२४ मध्ये एकही धक्का नाही...लातूर जिल्ह्याला २०२२ मध्ये भूकंपाचे ११ धक्के बसले. याची तीव्रता १.४ पासून ३.१ रिश्टर स्केलपर्यंत हाेती. २०२३ कमी धक्के जाणवले. ऑक्टाेबर २०२३ मध्ये भूकंपाचे चार धक्के बसले. याची तीव्रता १.६ ते २़८ रिश्टर स्केल हाेती. २०२४ मध्ये भूकंपाची एकही नाेंद झाली नाही.

लातूर जिल्ह्यात तीन ठिकाणी भूकंपमापन केंद्र...किल्लारी भूकंपानंतर लातूर जिल्ह्यात भूकंपमापन केंद्राची स्थापना केली. लातूर, औराद शहाजानी आणि आशिव (ता. औसा) येथे भूकंप मापन केंद्र असून, या केंद्रावर धक्क्यांची नाेंद हाेते.

लातूर-धाराशिवला सर्वाधिक बसले धक्के...३० सप्टेंबर १९९३ ते २०२३ या काळात लातूर-धाराशिव जिल्ह्यांना सर्वाधिक ७३ भूकंपाचे धक्के बसले आहेत. २००० मध्ये ५ धक्के, २००३ मध्ये ५ धक्के, २००४ मध्ये ७ धक्के, २००५ मध्ये १० धक्के, २००६ मध्ये ५ धक्के, २००८ मध्ये २ धक्के, २००९ मध्ये ७ धक्के, २०१० आणि २०११ मध्ये १० धक्के, २०१२ ते २०२३ मध्ये ३६ धक्क्यांची नाेंद झाली आहे.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूरMaharashtraमहाराष्ट्रhistoryइतिहास