ठाणे : दिवा पूर्व येथील मुंब्रादेवी कॉलनी परिसरात राहणाऱ्या नेहा पवार (२६) या महिलेची हत्या करून पसार झालेल्या मनोज सिंगच्या मुसक्या आवळण्यात ठाणे खंडणीविरोधी पथकाला यश आले आहे. आपली ओळख लपवण्यासाठी टक्क ल आणि दाडीमिशा वाढवून नाव बदलून तो नालासोपाऱ्यात राहत होता. पैशांच्या वादातून हत्या करून मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून पाण्याच्या ड्रममध्ये तो टाकून त्यात फिनेल ओतून ड्रम बंद केल्याची क बुली त्याने दिली.दिव्यातील आरती अपार्टमेंटमध्ये मनोज हा भाड्याने राहत होता. तो तीन महिन्यांपासून खोलीस कुलूप लावून संशयास्पदरीत्या गायब झाला होता. त्यामुळे खोलीमालक चंद्रा भोईर यांनी ३ आॅक्टोबरला कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी त्यांना पाण्याच्या टाकीतून दुर्गंधी आल्याने त्यांनी टाकी उघडताच एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्या महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. याचदरम्यान, पसार झालेला मनोज हा कमी विक्री होणाऱ्या वृत्तपत्रात प्लेसमेंटची बोगस जाहिरात करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारचे पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली. (प्रतिनिधी)>पैशांसाठी केला खूनमृत नेहा हिने ५ लाखांसाठी त्याच्याकडे तगादा लावला होता. ते दिले नाही तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करेन, असे धमकावले होते. ११ जुलै २०१६ रोजी पैशांची मागणी करण्यासाठी ती त्याच्या घरी आली होती. त्या वेळी दोघांमध्ये वाद झाल्याने तिची हत्या केल्याचे पोलीस म्हणाले.
हत्या करून पळालेला मारेकरी अटकेत
By admin | Published: October 08, 2016 3:01 AM