शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

किलोमीटर दर्शक स्टोन अस्पष्ट अन् दुरवस्थेत

By admin | Published: November 05, 2016 3:22 AM

सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या मुख्य व प्रचंड रहदारीच्या रस्त्यांवरील किलो मीटर दर्शक शीला (स्टोन) अस्पष्ट

पंकज राऊत,

बोईसर- पालघर तालुक्याची ग्रामीण भागातील सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या मुख्य व प्रचंड रहदारीच्या रस्त्यांवरील किलो मीटर दर्शक शीला (स्टोन) अस्पष्ट दिसत असून त्यांची प्रचंड दुरावस्था झाल्याने वाहन चालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे. या सुचना फलकांअभावी बाहेरील वाहन चालक भलत्याच मार्गावर जात आहेत. तसेच अपघात प्रवणक्षेत्र आणि धोकादायक वळण रस्त्यावरील सुचना फलकाअभावी अपघात नाहक निष्पाप बळी जात आहेत.धोका विरहित विना अपघात तसचे सुरक्षित व सुखकर प्रवासा बरोबरच वेळचा अपव्यय होऊ नये या करिता दर्जेदार व खड्डेमुक्त रस्त्यांची गरज असते तेवढीच गरज स्पष्ट व ठळकपणे दिसणारे कि.मी. दर्शक स्टोन, रस्त्यांविषयी मार्गदर्शन, अपघात प्रवणक्षेत्र, धोक्याची वळणे, गतिरोधकांविषयी सुचना, पुल व अरुंद मोऱ्या इ. अनेक सुचनाचे दगड व फलक दिवसा व रात्रीच्या अंधारात ठळक व त्वरीत दिसणे अत्यंत गरजेचे असुनही या अत्यंत सुरक्षिततेच्या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्दैवाने अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने पालघर तालुकयातील बहुसंख्य रस्त्यावरील माहिती फलक व सुचनांची स्थिती भयावह झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याची अवस्था दिशाहीन झाल्यासारखी आहे.या अत्यंत महत्वाच्या गोष्टीची दखल सार्वजनिक बांधकाम खाते गंभिरतेने घेत नसुन वर्षानुवर्षे कि.मी. दर्शक स्टोन दुलक्षित झाले आहेत. तर पालघर जिल्हयाच्या निर्मितीला सव्वा दोन वर्षे होऊनही काही ठिकाणच्या फलकांवर अजुनही सा.बा. ठाणेचेच फलक दिसत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची उंची वाढल्याने मैलाच्या दगडांची उंची अर्ध्यावर आली आहे. तर गतिरोधकांच्या विषयी माहिती देणारे सुचना फलकही गायब झाल्यांने गतिरोधकांवर दुचाकीस्वार आपटुन गंभिर अपघात होत आहेत. कि.मी दर्शक स्टोन व सुचना फलक अस्पष्ट आहेतच पंरतु बहुसंख्य फलक हे झाडी झुडप व वेलींनी व्यापले आहेत. काही स्टोन चा वापर तर चित्रपटाची पोस्टर्स व व्यावसायीक आपल्या जाहिराती चिटकविण्यासाठी वर्षानुवर्षे सर्रास पणे करीत आहेत. वास्तविक अशा चुकीच्या जागेवर पोस्टर व जाहिरात बाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.>अंधारात रस्त्याच्या कडेचा अंदाज चूकतोपूर्वी रस्त्याच्या कडेला जी वडाची झाडे आहेत त्या झाडांच्या बुध्याला तीन ते चार फटांपर्यंत सफेद चुना व लाल गेरू रंग लावून बुंधे रगवत होते. त्यामुळे दाट अंधारात रस्त्याच्या कडेचा अंदाज वाहनचालकांना यायचा आता झाडांचे बुंधे फारसे रंगविले जात नाहीत.झेब्रा क्रॉसिंग चे पट्टेही कूठे दिसत नसल्याने वाहन चालक सांगत आहेत तर या बाबतीत सार्वजनिक बांधकाम खात्याने गंभिर दखल घेऊन कि.मी. स्टोन दर्शक व सुचना फलक अद्ययावत करण्याची मागणी पंचायत समितीचे सदस्य सुशिल चुरी यांनी केली आहे. धोक्याच्या वळण रस्त्यांवर सुचना फलकांअभावी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यांची उंची वाढल्याने मैलाच्या दगडांची उंची अर्ध्यावर आली आहे.