नायगांव : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील समजल्या जाणा:या वसई ते डहाणू किना:याबाबत वसईत चर्चेला उधाण आले आहे. वसईतील राजोडी किना:यावर अज्ञात अवाढव्य वस्तू समुद्रमार्गे किना:यावर येऊन पडल्याने या भागात मंगळवार संध्याकाळपासून संशयाचे वातावरण होते. सागरी तटरक्षक दलाचे सदस्य व नालासोपारा, अर्नाळा पोलीसांनी जागेवर जाऊन याबाबत पाहणी केली. मात्र काहीच मागमूस लागलेला नाही.
राजोडी येथील नील रिसॉर्टसमोरील समुद्रकिना:यावर ही भली मोठी पाईपसदृश वस्तू आढळली. 12क् फुट लांब व 3 फुट व्यासाची लोखंड व फायबरने बनवलेली ही वस्तू नेमकी कोणती याबाबत संभ्रम आहे.
वसई तहसिल कार्यालयाला याबाबत माहिती मिळाल्यावर ओ.एन.जी.सी, नेव्ही व बंदर विभागाला याची माहिती देण्यात आली. संबंधीतांनी त्याची पाहणी केली तरी ही वस्तू कोणती याचे प्रश्नचिन्ह 24 तासानंतरही कायमच होतं. विशेष म्हणजे ती खेचून नेण्याइतकी शक्तीशाली यंत्रणा स्थानिक पातळीवर नाही.
यापूर्वी भुईगांव किना:यावर बनावट काडतुसांचा बॉक्स सन 2क्1क् मध्ये सापडला होता. 2क्13 मध्ये अर्नाळा येथे संशयास्पद बोटीला जलसमाधी मिळाली होती. यानंतर सदर संशयास्पद वस्तू हरवल्याची तक्रार अजूनही कुठल्याच व्यक्ती वा संस्थेने दाखल न केल्याने याबाबत संभ्रम कायम आहे. (वार्ताहर)
ही अज्ञात वस्तू आली कुठून याची माहिती अजूनही मिळालेली नाही. पुढील तपास बंदर अधिकारी करीत आहेत.
- राजेंद्र चव्हाण,
तहसिलदार, वसई
नेव्हीसह स्थानिक पोलीसांनी याची पाहाणी केली तसेच ओएनजीसीला ही माहिती देण्यात आली आहे. 12क् फुटाची ही वस्तू असून त्यावर हक्क सांगणारे अजूनही कुणी आढळलेले नाही.
- विलास देशमुख,
बंदर निरीक्षक