मुंबई : जवळपास ९ हजार कोटी रुपये कर्ज घेऊन परदेशात जाऊन बसलेले विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सचे ब्रॅण्डस आणि ट्रेड मार्क्सवर बोली लावून पैसा वसूल करण्याच्या बँकांच्या प्रयत्नावर पुन्हा पाणी पडले आहे. एकेकाळी खास चर्चेत राहिलेली किंगफिशर एअरलाईन्सची टॅगलाईन ‘फ्लाय द गुड टाइम्स’ खरेदी करण्यासाठी कोणीही बोली लावली नाही.दरम्यान, मल्ल्या यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पैसा गुंतविलेल्या ४० कंपन्यांची अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआय चौकशी करीत आहेत, असे वृत्त आहे. त्यातील बहुतेक कंपन्या परदेशात असून, त्या बहुधा नेदरलँड, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, चीन आणि नेपाळमध्ये आहेत. बँकांकडून घेतलेले कर्ज मल्ल्या यांनी या कंपन्यातच गुंतविल्याची शंका आहे.
किंगफिशर ब्रॅण्डला खरेदीदार मिळेना
By admin | Published: May 01, 2016 1:21 AM