डोंबिवली : प्रोबेस एंटरप्रायझेस कंपनीत गुरुवारी सकाळी झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती कल्याण पोलीस नियंत्रण कक्षाचे प्रमुख गौतम रणदिवे यांनी दिली. तर, १४० जण जखमी झाले आहेत. जखमींना डोंबिवलीतील आयकॉन, एम्स, शिवम् आणि शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयकॉन रुग्णालय घटनास्थळापासून जवळ असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात जखमींना दाखल करण्यात आले होते. आठ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. विविध रुग्णालयांत दाखल झालेल्या जखमींना गंभीर दुखापत झाली आहे. आयकॉन रुग्णालयाने उपचार करून जवळपास ६० जणांना घरी सोडले आहे. त्यांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. शिवम् रुग्णालयात ज्योती मोगरे, सचिन मोगरे आणि जितेंद्र परदेशी यांना उपचार करून घरी सोडण्यात आले. रुग्णालयात दाखल असलेले जखमीशास्त्रीनगर रुग्णालयसुशीला विठ्ठल शिंदे (६७), धनश्री राजेश शिंदे (१४), सुगंधा राजेश शिंदे (४०), मानसी राजेश शिंदे (१९), ऊर्मिला शिंदे (११), क्षितिज शिंदे (५), अस्मिता अनिल माधव (४०), सविता भुराळे (३९), चंद्रकांत पाटील (४५), पुष्पा रणदिवे (३८), जागृती श्यामसुंदर दूधवाले (१९), मोहन मिठाईलाल भारती, राकेश राजाराम जैस्वाल, तुषार हांडे.एम्स रुग्णालयराजेश रघुनाथ राजे (४४), वीरेंद्र बाकेलाल सिंग (२२), संदीप गायकवाड (२४), विक्रम वामन निवाते (३५), पुष्पराज प्रकाश भोळे (३०), भालचंद्र रामदास वारळकर (३३), अनिल बाबाराम कदम (३०), सागर सनगरे (२७), ओमप्रकाश प्रल्हाद कदम (२६), यशोदा तांबे (८०), विजयकुमार तुकाराम हलवाणी (२४), जगदीश जनार्दन आचार्य (५४), अशोक सुभाष चव्हाण (३२) आणि सागर रमेश पवार.शिवम् रुग्णालयमंगेश मानकर (२८), स्वप्नील (३५), धर्मादेव गुप्ता (२०), कुणाल कोट (५४), अब्दुल्ला (२१), मंजूळा वनपार्टी (२६), गिरीश पाटील (४५), राजेश रावण (५०), आर.पी. दोपरे (२०), प्रियंका घाडगे (२८), सुरेश पावा (५३), प्रदीक कराडे (२६), वनिता तांडे (३१), रेणुका शिंदे (१९), मनीषा विजणकर (४३), जया आडिवलीकर (३६), नितेश पुजारी (२३), कविता भुरे (१९) अनुश्री नडगी (४६).आयकॉन रुग्णालयशोभनाथ गुप्ता (७०), वली मुरली यादव (४०), संजय रामुगाडे, उमेश प्रसाद, रेखा कारी, भाकाजी बाबडी, रवींद्र वालावलकर, स्नेहा मोरे.पाटील रुग्णालय : अरविंद, नीशा निगडे, रेवण पांडे, राहुल कोरी, मनीषा पाटील.
किंकाळ्या आणि धावपळ
By admin | Published: May 27, 2016 4:36 AM