शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

किपलिंगचा ‘जेजे’शी काय संबंध ?

By admin | Published: September 24, 2015 1:47 AM

जालियनवाला बाग हत्याकांडात मायकेल ओडवायरला पाठीशी घालण्याचे काम करणाऱ्या व साहित्याचे नोबेल मिळविणाऱ्या रुडियार्ड किपलिंग यांचा जन्म जे. जे. स्कूल आॅफ आर्टमधल्या डीन बंगल्यात झाला

अतुल कुलकर्णी, मुंबई जालियनवाला बाग हत्याकांडात मायकेल ओडवायरला पाठीशी घालण्याचे काम करणाऱ्या व साहित्याचे नोबेल मिळविणाऱ्या रुडियार्ड किपलिंग यांचा जन्म जे. जे. स्कूल आॅफ आर्टमधल्या डीन बंगल्यात झाला एवढ्या एकाच निकषावर पुरातत्त्व विभागाने या बंगल्याला प्राचीन व ऐतिहासिक संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या निर्णयाचे कलावंतांमध्ये मात्र संतप्त पडसाद उमटले आहेत.पुरातत्त्व विभागाच्या या निर्णयामुळे ब्रिटिश स्थापत्य कलेचा नमुना असणारे १८०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम आणि सभोवतालचा ४ हजार चौरस मीटरचा परिसर संरक्षित स्मारक बनले आहे. याच ठिकाणी आर. के. लक्ष्मण यांचेही स्मारक केले जाईल, असेही पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. ही तर सरळसरळ दडपशाही आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कलावंतांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्रख्यात व्यंगचित्रकार शि. द. फडणीस म्हणाले, आर.कें़च्या योगदानाबद्दल प्रश्नच नाही. मात्र अनेक धुरंधर चित्रकारांच्या चित्रांची आबाळ होत असताना असे निर्णय घेणे योग्य नाही. आर. के. राजकीय व्यंगचित्रकार होते. त्यांचे काम वर्तमानपत्रातून प्रकाशित होत असे. त्यामुळे पत्रकारितेशी संबंधित अनेक संस्थांमध्ये सरकारने त्यांचे स्मारक जरूर करावे; पण जेजेमध्ये अशा गोष्टी करणे औचित्याला धरून नाही. माझ्या मताशी ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे हेदेखील सहमत असल्याचे फडणीस म्हणाले. कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे राज चित्रकार आबालाल रहेमान, अजिंठ्याच्या प्रतिकृतीचे काम करणारे पेस्तनजी बोमनजी, दिल्लीच्या साऊथ आणि नॉर्थ ब्लॉकमध्ये ज्यांची पेंटिंग्ज लागली ते रावबहाद्दूर धुरंधर असोत किंवा जागतिक कीर्तीचे शिल्पकार गणपतराव म्हात्रे, पोर्तुगाल सरकारने स्वत:च्या खर्चाने ज्या ए. एक्स. त्रिंदाद यांचे म्युझियम उभे केले़ अशा सगळ्या जागतिक दर्जाच्या कलावंतांमध्ये समान धागा होता तो मुंबईच्या जे. जे. स्कूल आॅफ आर्टचा. या ठिकाणी शिकलेल्या आणि नोकरी केलेल्या या सगळ्यांच्या अनेक कलाकृती आजही जेजेमध्ये धूळखात पडून आहेत. असे असताना किपलिंग यांचे स्मारक उभारणे योग्य नसल्याचे कलावंतांचे म्हणणे आहे. यासंदर्भात बॉम्बे आर्ट सोसायटी आॅफ इंडिया, संस्कार भारती आणि आर्ट सोसायटी आॅफ इंडिया यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पत्रे पाठवली आहेत.किपलिंगचे स्मारक ‘जेजे’त म्हणजे देशद्रोह नाही का?जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणाऱ्या रुडियार्ड किपलिंग यांचे स्मारक जे़जे़सारख्या वास्तूत करणे म्हणजे देशद्रोह होत नाही का? जगातल्या कोणत्याही देशात नाही असा १५८ वर्षांचा संपन्न कलाकृतींचा खजिना जेजेमध्ये बंदिस्त आहे. त्याकडे दुर्लक्ष करून केवळ डीन बंगल्यात जन्म झाला म्हणून स्मारक केले जात असेल तर यासारखे दुर्दैव दुसरे असूच शकत नाही.- वासुदेव कामत, अध्यक्ष, आर्ट सोसायटीआंदोलन करू... ऐतिहासिक चित्रांचा कायमस्वरूपी संग्रह न करता फडतूस कल्पना मांडून कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा अवमान करणे योग्य नाही. आधीच्या शासनाने असेच केले व आताच्या शासनाचेही तेच सुरू आहे. हे थांबवले नाही तर आंदोलन करू. - सुहास बहुलकर, ज्येष्ठ चित्रकार