मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ जेम्स अॅण्ड ज्वेलरी संस्थेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नुकतेच संस्थेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या किरीट भन्साली यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर संचालकपदी नमिता पांड्या, अनिल विरानी, अशोक गजेरा यांची निवड करण्यात आली आहे.पूर्वीच्या संचालक मंडळातील प्रवीणशंकर पांड्या (जेम ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिलचे अध्यक्ष), वसंत मेहता, दिलीपकुमार लाखी, संजय काठोरी, निर्मलकुमार बरमेचा, आशिष कोठारी, राज हितेन पारीख हे कार्यरत असतील. नवनियुक्त अध्यक्ष किरीट भन्साली हे प्रख्यात उद्योजक आहेत. तसेच, जागतिक स्तरावरील ‘ स्काय जेम्स अँड स्मितल जेम्स’चे भागीदारही आहेत. भन्साली हे जेम ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल आणि भारत डायमंड बोर्सचे सदस्यही आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ जेम्स अॅण्ड ज्वेलरी संस्थेने बीए डिगरी इन ज्वेलरी या अभ्याक्रमासाठी मेवार विद्यापीठाशी सहकार्य घेतले आहे. तसेच, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ जेम्स अॅण्ड ज्वेलरी संस्था सध्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटच्या सहयोगाने ज्वेलरी व्यवस्थापन क्षेत्रातही संशोधनात्मक अभ्यास करत आहे. (प्रतिनिधी)
किरीट भन्साली यांची अध्यक्षपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2016 3:22 AM