Kirit Somaiya attack case: भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiyya) यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि उद्धव सरकारमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. दरम्यान, सोमय्या यांच्यावर झालेल्या दोन हल्ल्यांनंतर सीआयएसएफचे(CISF) मुख्यालय या विषयाला गांभीर्याने गेत आहे. झेड सुरक्षा(Z security) कवच असलेल्या व्यक्तीवर अशाप्रकारे दोनदा हल्ला होणे ही चिंतेची बाब आहे.
कमांडरचे आयुक्तांशी संवादसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयएसएफ कमांडरने यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या जवानांना आता प्रत्येकवेळी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्ला झाल्यास घटनास्थळीच हल्लेखोरांवर गोळ्या झाडण्याचे आदेशही दिले जाऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणने आहे.
किरीट सोमय्या यांच्या गाडीवर गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह शिवसेनेच्या चार जणांना अटक केली. खार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महाडेश्वर व्यतिरिक्त शिवसेनेचे माजी नगरसेवक हाजी हलीम खान आणि पक्षाचा कार्यकर्ता दिनेश कुणाल यांनाही अटक करण्यात आली आहे.
गृहमंत्रालयाकडे तक्रारभाजपच्या महाराष्ट्र युनिटच्या शिष्टमंडळाने सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली आणि त्यांना सोमय्या यांच्यावरील हल्ल्याची चौकशी करण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची विनंती केली.