शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
3
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
4
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
5
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
6
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
7
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
8
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
9
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
10
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
11
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
12
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
13
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
14
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
15
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
16
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
17
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
18
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
19
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
20
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत

"माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न, मोदीजी आणि देवाच्या कृपेनं बचावलो"; किरीट सोमय्यांकडून जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 10:39 AM

ठाकरे सरकार हे तर उद्धट ठाकरे सरकार असून माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न या सरकारच्या प्रतिनिधींकडून केला जात आहे.

मुंबई-

ठाकरे सरकार हे तर 'उद्धट' ठाकरे सरकार असून माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न या सरकारच्या प्रतिनिधींकडून केला जात आहे. पण मोदीजी आणि देवाच्या कृपेमुळे मी काल बचावलो, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. काल रात्री खार पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांकडून सोमय्या यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमय्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात सोमय्या जखमी देखील झाले होते. त्यानंतर त्याच अवस्थेत सोमय्यांनी वांद्रे पोलीस ठाणे गाठले होते. कालचा संपूर्ण प्रकरणानंतर किरीट सोमय्या यांनी आज मुलुंडमधील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनेची माहिती दिली. 

किरीट सोमय्या यांनी यावेळी ठाकरे सरकारवर थेट टीका करत कालचा प्रकार म्हणजे पोलिसांच्या संगनमताने माझी हत्या करण्याचा कटच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "माझा मनसुख हिरेन करण्याचा कट ठाकरे सरकारचा आहे. आतापर्यंत मला तीन वेळा मारण्याचा प्रयत्न झाला आहे. पण जनता माझ्यासोबत आहे. राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जीवंत आहे. त्यामुळे माझ्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. उद्धट ठाकरे सरकारच्या नेत्यांना आम्ही पाहून घेऊ. मला मारणारा या हिंदुस्तानात जन्माला आलेला नाही", असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला आहे. 

केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणारखार पोलीस ठाण्याबाहेर घडलेल्या घटनेच्याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा केंद्रीय गृहसचिवांशी बोलणार असून याबाबत त्यांची भेट घेणार असल्याचंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं. राज्यात भाजपा नेत्यांविरोधात घडत असलेल्या घटनांची माहिती गृह सचिवांना देऊन याबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी केली जाणार असल्याचं सोमय्या म्हणाले. 

मी येणार याची माहिती आधीच दिली गेली "राणा दाम्पत्याला मी भेटायला येणार असल्याची माहिती आधीच तिथं दिली गेली होती. त्यामुळेच इतके गुंड तिथं जमा झाले होते. पोलिसांच्या संगनमतानंच सारं घडलं आहे. कारण मी तिथून सुरक्षित बाहेर पडण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली होती. त्यांनी मला आश्वस्त केल्यानंतरच मी तिथून निघालो होतो. पण गेटबाहेर येताच माझ्या गाडीवर माफिया सेनेचे गुंड तुटून पडले. चपला, काचेच्या बाटल्या, दगडफेक करण्यात आली. यावर पोलिसांनी काहीच केलं नाही. माझ्यासोबत असलेल्या कमांडोमुळेच मी सुखरुप बाहेर पडू शकलो. त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे", असं किरीट सोमय्या म्हणाले. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाShiv Senaशिवसेना