मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नाशिक दौरा रद्द करुनरा ष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. वाय बी चव्हाण सेंटरवर ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कारभार, निर्णय यावर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. तर याच बैठकीवरून भाजपने महाविकास आघाडीच्या सरकारवर निशाणा साधला आहे.
पवारांनी बोलवलेल्या बैठकीवर बोलताना भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले की, शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठक बोलवली असून, दुसरीकडे काँग्रेसच्या मंत्र्यांची सुद्धा सतत बैठका सुरु आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत हे रोज सामनातून आपल्या मंत्र्यांना रोज वेगळा सल्ला देत आहे. तीनही पक्ष आपापल्या आघाडी पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न करतायेत, असे किरीट सोमय्या म्हणाले.
तर गेल्या एक महिन्यात या सरकारमधील डझनभर मंत्र्यांनी एकमेकांना कापण्याची स्पर्धाच लावली आहे. तर या तीनही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करत आहे. त्यामुळे "काय होणार या उद्धव सरकारच" असा खोचक टोलाही सोमय्या यांनी यावेळी लगावला.