21 जानेवारीला अनिल परबांचे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. तीन महिन्यांची मुदत होती. ती ३ मे रोजी संपली आहे. आता केंद्रीय मंत्री केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी अखेरचा आदेश देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. तसेच परबांचे रिसॉर्ट लवकरच पाडले जाणार असल्याचे ते म्हणाले.
आम्ही ब्लॅकमेल करतो, पैसे जमवतो असा उद्धव ठाकरेंनी तमाशा केला. ईओडब्ल्यूने जे लिहून दिलेय त्यात काहीच दम नाहीय. हिंमत असेल तर तो अहवाल जाहीर करा. मुख्यंमंत्री खोटारडे आहेत. जितेंद्र नवलानी यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. तक्रारदार खोटारडा आहे, असे त्यात आहे, असे सोमय्या म्हणाले. याचचबरोबर संजय राऊत यांच्या युवक प्रतिष्ठानच्या घोटाळ्यावरील आरोपावर हसू येते, असे ते म्हणाले.
संजय पांडेंच्या आदेशावरून थेट एफआयआर नोंदविला जात आहे. ठाकरेंची माफियागिरी लवकरच संपणार आहे. संजय राऊतांनी आमच्याविरोधात ४२२ ट्वीट केली आहेत. आता कोर्ट जेव्हा बोलविणार तेव्हा संजय राऊतांनी विषय बदलायला सुरुवात केलीय.
रामाच्या चरणी कोणालाही जायला सूट असते. मनसे आणि माफिया सेनेचं भांडण चालू आहे. उद्धव ठाकरे यांनी भगवा झेंडा उतरवून रोज सकाळी उठून हिरवा रंग घेतला आहे. रोज सकाळी उठून माफिया सेनेचे लोक एक दुसऱ्याला जय राम जी की, जय महाराष्ट्र म्हणत फिरतात, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे.