शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

किरीट सोमय्यांचे ठाकरे पिता-पुत्रांवर पुन्हा गंभीर आरोप, संजय राऊतांवरही साधला निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 2:40 PM

Kirit Somaiya News: पुण्यात किरीट सोमय्यांना झालेली मारहाण, त्यानंतर तिचे शिवसेनेकडून झालेलं समर्थन आणि आज संजय राऊत यांनी भाजपावर केलेले गंभीर आरोप, यानंतर आता आज पुन्हा एकदा किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर टीका केली.

मुंबई - शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वाद पुन्हा एकदा विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. पुण्यात किरीट सोमय्यांना झालेली मारहाण, त्यानंतर तिचे शिवसेनेकडून झालेलं समर्थन आणि आज संजय राऊत यांनी भाजपावर केलेले गंभीर आरोप, यानंतर आता आज पुन्हा एकदा किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर टीका केली. तसेच भाजपावर गंभीर आरोप करणाऱ्या संजय राऊत यांच्यावरही सोमय्या यांनी निशाणा साधला.

किरीट सोमय्या म्हणाले की, कोरोनाकाळात कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले. वडील उद्धव ठाकरे  आदेश देतात की त्या संबंधित कंपनीला काम देऊ नका, पण त्यांचेच पुत्र आदित्य ठाकरे त्या कंपनीला काम देतात. पैशासाठी तुम्ही मुंबई आणि पुणेकरांचा जीव धोक्यात घातला होता. ५८ कोटी रुपयांचे कंत्राट सुजित पाटकर यांना मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी दिले. हा सुजित पाटकर संजय राऊत याचा पार्टनर आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

यावेळी किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली, ते म्हणाले की, संजय राउत यांनी जे घोटाळे केले त्याचे एकही उत्तर देण्यासाठी तयार नाहीत, एका किरीट सोमय्या याची हत्या झाली तर 100 किरीट सोमया तयार होतील. संजय राऊत हे मोठ्या हिमतीने सांगत आहेत की, लालू प्रसाद यादवांना भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगामध्ये टाकले आहे. त्यामुळे त्यांनाही तुरुंगामध्ये जावं लागतंय की काय, असं राऊतांना वाटतंय, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला.

तसेच किरीट सोमय्या हे नशेत आरोप करत असतात, अशा संजय राऊत यांनी केलेल्या टिकेलाही सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मी आयुष्यात कधी विडी, सिगारेट बिअरही प्यायलो नाही. अंडही खाल्लं नाही. माझ्यात नशा आहे ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची. माझ्यात नशा आहे उद्धव ठाकरेंच्या माफियागिरीला संपवण्याची माझ्यात नशा आहे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला लुटणाऱ्या आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडून पैसे आणण्याची, असे किरीट सोमय्या म्हणाले.  

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना