नाशिक : संशोधक, समीक्षक व कार्यकर्ता असे व्यक्तीमत्व असलेले कोल्हापूरचे डॉक़ृष्णा किरवले यांची हत्त्या ही पुरोगामी महाराष्ट्राला वेदना देणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले़ हुतात्मा स्मारकात मंगळवारी (दि़७) आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते़ कसबे यांनी सांगितले की, डॉ़किरवले हे त्यांच्या विद्यार्थिदशेपासूनचे माझे कौटुंबिक मित्र होते़ त्यांचा अस्मितादर्श या नियतकालिकातील निष्ठेचा प्रवास मी जवळून पाहिलेला आहे़ ते एक संशोधक, समीक्षक आणि कार्यकर्ता असे त्यांचे व्यक्तीमत्त्व आंबेडकर चळवळीत अधोरेखित आहे़ साहित्य क्षेत्रातील कार्यकर्ते विचारवंत डॉ़किरवले यांच्या हत्त्येमुळे पुरोगामी आणि विवेकवादी महाराष्ट्रात एक पोकळी निर्माण झाली आहे़प्राग़ंगाधर अहिरे यांनी सांगितले की, डॉक़ृष्णा किरवले यांनी आंबेडकरी शाहिरीवर केलेले संशोधन मूलगामी ठरलेले आहे़ समग्र बाबुराव बागूल या त्यांच्या ग्रंथामुळे आंबेडकरी विचारविश्व मराठी वाडगमयाच्या क्षेत्रात अधोरेखित झालेले आहे़ त्यांनी दलित साहित्यातील लोकप्रवाह याची चिंतनातून मांडणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना दलित साहित्यातील विविध प्रवाहांचे आकलन होणे सोयीचे झाले आहे़ ते केवळ साहित्यिक नव्हते तर कार्यकर्ता लेखक म्हणून पुरोगामी चळवळीत सर्वदूर परिचित होतेक़वि किशोर पाठक यांनी किरवले यांच्या हत्त्येमुळे मराठी साहित्याला उर्जा देणारा एक विचारवंत हरपल्याचे सांगितले़यावेळी डॉ़शंकर बोराडे, डॉ़संजय जाधव, राजू देसले, श्रीकांत बेणी, डॉ़धीरज झाल्टे, प्रा़महादेव कांबळे, राकेश वानखेडे आदींनी आपल्या भावना प्रकट केल्या़ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन भुजबळ यांनी तर शोकसभेचे आयोजन अॅड़अशोक बनसोडे, चंद्रकांत गायकवाड, अॅड़अरुण दोंदे यांनी केले होते़ फोटो :- ०७पीएचएमआर ११९डॉक़ृष्णा किरवले यांच्या हत्येप्रकरणी हुतात्मा स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत उपस्थित डॉ़रावसाहेब कसबे़ समवेत किशोर पाठक, गंगाधर अहिरे़
पुरोगामी महाराष्ट्रासाठी किरवलेंची हत्त्या वेदनादायी
By admin | Published: March 07, 2017 9:58 PM