- अक्षय चोरगेमुंबई - अखिल भारतीय किसान सभेतर्फे ६ मार्चपासून काढण्यात आलेला नाशिक ते मुंबई लाँग मार्च रविवारी मुंबईत दाखल झाला. मुलुंडपासूनच या मोर्चाचे मुंबईकरांनी स्वागत केले. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी, संघटनांनी, संस्थांनी, सार्वजनिक मंडळांनी ठिकठिकाणी पाण्याची, अल्पोपाहाराची, बिस्किटांची व्यवस्था केली असल्याचे पाहायला मिळाले. सहा दिवस अहोरात्र उन्हात चालूनदेखील शेतकरी प्रचंड उत्साही दिसले. १२ मार्च रोजी आंदोलक विधान भवनाला बेमुदत घेराव घालणार आहेत.मोर्चाला मदत करणाºया विविध संस्था, संघटना आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आम्ही जरी मुंबईसारख्या शहरात राहत असलो, तरी आमचे वडील, काका, आजोबा, मामा गावाकडे शेती करतात. मुंबईत मिळणारा भाजीपाला, धान्य, कडधान्यांपासून ते साखर, तेलापर्यंत सर्व वस्तू शेतकºयांच्या कष्टामुळे आपल्याला मिळतात. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकºयांमध्ये बहुतांश शेतकरी हे वयोवृद्ध आहेत.सहा दिवस अहोरात्र, उपाशीपोटी, अर्धपोटी चालत असूनही शेतकरी उत्साही दिसले. बहुसंख्य शेतकरी विविध वाद्ये वाजविताना, वाद्यांच्या तालावर नृत्य करताना पाहायला मिळाले, तर अनेकांनी सोबत स्पीकर्स ठेवले होते. काही वेळ शांतपणे मोर्चा पुढे सरकल्यानंतर, कोणीतरी मध्येच ‘लाल बावटा... झिंदाबाद’ अशी घोषणा देऊन वातावरण पुन्हा उत्साही करण्याचा प्रयत्न करत होते.आंदोलकांनी संबळ, पिपाणी, ढोलकी, बासरी आणली होती. वाद्यांच्या तालावर शेतकरी ‘कहाळी’ या आदिवासी नृत्यप्रकारावर आधारित नृत्याचे सादरीकरण करत होते. स्त्रिया पारंपरिक गाणी म्हणत होत्या.संत बाबा ठाकरसिंगजी कास सेवा विक्रोळी (विक्रोळी गुरुद्वारा) तर्फे आंदोलकांसाठी नाश्ता, पाणी आणि अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. दी बॉम्बे कॅथलिस सभेतर्फे विक्रोळी येथे आंदोलकांसाठी पाणी आणि बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती.आंदोलनकर्त्यांना मोबाइल चार्ज करण्यासाठी कोठेही वीज उपलब्ध नाही. उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी लक्ष्मण भसरे यांनी ‘सोलार पॅनेल’ सोबत आणले आहे. हे पॅनेल डोक्यावर अडकवून दिवसभर सहकाºयांचे मोबाइल, टॉर्च चार्ज करून देत आहे. भसरे यांनी सांगितले की, अजूनही तीन-चार शेतकºयांनी असा ‘जुगाड’ केला आहे. पॅनेल डोक्यावर असल्याने उन्हाचा त्रास होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
किसान मोर्चाला मुंबईकरांचीही साथ, ठिकठिकाणी पाण्याची, अल्पोपाहाराची, बिस्किटांची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 5:32 AM