मुंबई: देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असल्याचे आढळून येत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अधिकच गंभीर असून, अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे कोरोना रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स अपुरे पडत आहेत. कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना दिसत आहे. कोरोनासह राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही वाढताना दिसत आहेत. एकीकडे सरकार कोरोना स्थितीशी दोन हात करत असताना, विरोधी भाजपसह अन्य पक्ष सातत्याने टीका करताना दिसत आहेत. याला सरकारकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव असल्याची टीका करण्यात आली आहे. (kishori pednekar criticized devendra fadnavis on shortage of remdesivir injection issue)
राज्यातील परिस्थिती पाहता सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे. पण तसे दिसत नाही. विरोधक खूपच आक्रमक झालेले आहेत. योद्धा म्हणून काम करायला तयार नाहीत. परिस्थिती अधिकाधिक कशी बिकट होईल, यासाठी लक्ष दिले जात आहे, अशी बोचरी टीका मुंबईच्या महापौरकिशोरी पेडणेकर यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
आणखी कडक निर्बंध की लॉकडाऊनच?, मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेणार; मंत्र्यांचं सूचक विधान
हे किती मोठं दुर्दैव आहे
एकीकडे खूपच कठीण परिस्थितीतून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता जात आहे. जबाबदारी काम केल्यास यातून निश्चितच बाहेर पडू. रेमडेसिवीरचा साठा पकडल्यानंतर माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता पोलीस ठाण्यात जातात. त्यांचा उद्देश काहीही असेल. परंतु, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना रात्रीच्या दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन जावे लागत आहे, हे किती मोठे दुर्दैव आहे. मुंबईत साठा पकडला गेला आहे. लोक वणवण भटकत आहे आणि हे काय चालले आहे, अशी विचारणा पेडणेकर यांनी यावेळी केली.
सीरमला ३ हजार कोटी देणार; लस उत्पादन वाढवण्यासाठी केंद्राचा निर्णय
मुख्यमंत्री वेगवेगळ्या उपाययोजना करतायत
महाराष्ट्र बिकट परिस्थितीत चालला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात तसेच सुलभ होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी चालक कमी पडत असल्याने परिवहन मंत्री त्यासाठी काम करत आहे. महापालिका आयुक्तांनी ऑक्सिजन उत्पादकांनाही आदेश दिले आहेत, असे किशोरी पडणेकर यांनी म्हटले आहे.
पाच किंवा त्याहून जास्त कोरोना रुग्ण असलेली बिल्डिंग 'मायक्रो कंटेन्मेंट झोन'; नियम मोडल्यास दंड
दरम्यान, संचारबंदी, जमावबंधी आणि कडक निर्बंध लावूनही जनतेला कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. राज्यात १ मे पर्यंत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंध वाढवावे लागणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. तसेच कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार असून, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतरांशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेतील, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.