मुंबई : राष्ट्रवादीतील फुटीनंतर आज मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. आज राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतंत्र बैठका बोलावल्या आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहेत? याचा निश्चित आकडा अजूनही समोर आलेला नाही. मात्र, पक्ष संघटना आणि आमदार कोणासोबत आहेत? हे दाखवण्याचा दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरु आहे.
आज मुंबईतील वांद्रे येथील एमआयटी या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. तर शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बोलावली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत एकूण 54 आमदार आहेत. अजित पवार यांच्याकडे तब्बल 44 आमदारांच समर्थन असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला जवळपास 30 आमदार पोहचले आहेत, तर शरद पवारांच्या बैठकस्थळी 9 आमदार पोहोचले आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या बाजुने संख्याबळ अधिक आहे.
अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांची नावे...
1) अजित पवार
2) छगन भुजबळ
3) धर्मराव आत्राम
4) अण्णा बनसोडे
5) माणिकराव कोकाटे
6) अनिकेत तटकरे
7) संजय बनसोडे
8) सुनील शेळके
9) निलेश लंके
10) हसन मुश्रीफ
11) नरहरी झिरवाळ
12) दिलीप वळसे पाटील
13) अमोल मिटकरी (एमएलसी)
14) रामराजे निंबाळकर
15) दत्ता भरणे
16) आदिती तटकरे
17) विक्रम काळे (एमएलसी)
18) धनंजय मुंडे
19. सुनील विजय टिंगरे
20) अनिल पाटील
21) संग्राम जगताप
22) दिलीप बा क्वेंकर
23) नितीन पवार
24) इंद्रजीत नाईक
25) शेखर निकम
26) राजेश पाटील