मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही अजून कोकणात जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू झालेली नाही. यावरून राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यात ढकलाढकली सुरू आहे. ‘रेल्वे सोडू नका, आदेशाची वाट पाहा,’ असे राज्य सरकारने आम्हाला सांगितले असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे. तर गाड्या सुरू करण्याची जबाबदारी रेल्वेची असून ही सेवा सुरू करण्यास आमचा विरोध नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, राज्य सरकारकडून ७ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेला विशेष गाड्या चालविण्यासाठी पत्र दिले होते. त्यानंतर रेल्वे बोर्डानेही ९ आॅगस्ट रोजी या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला. ११ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी या विशेष गाड्या सोडण्याची तयारी रेल्वेने केली होती. जवळपास १९० हून अधिक गाड्या सोडण्याचे नियोजन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र राज्य सरकारच्या अधिकाºयांनी अचानक हा निर्णय थांबवण्याच्या तोंडी सूचना दिल्या. लेखी अधिकृत पत्र देण्याची विनंती रेल्वे अधिकाºयांनी राज्य सरकारला केली. परंतु, तसे पत्र त्यांनी पाठविले नाही.आम्ही सज्ज!राज्य सरकारने गणेशोत्सवात कोकणात जाणाºया चाकरमान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्यास सज्ज राहा, असे पत्र मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वे प्रशासनाला पाठविले होते. परंतु रेल्वेने तयारी केल्यानंतरही राज्य सरकारकडून आम्हाला ‘रेल्वे सोडू नका, आदेशाची वाट पाहा,’ असे सांगण्यात आल्याने ही सेवा सुरू झालेली नाही, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.
कोकणच्या रेल्वे प्रवासाला राज्याचा खोडा?; रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 5:20 AM