कोल्हापूर : कारगील विजय दिनाबद्दल जनजागृती करण्यासाठी अभिमानस ग्रुपच्या वतीने कोल्हापूर - कारगील - कोल्हापूर अशा बुलेट मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जुलै रोजी कोल्हापुरातील एन. सी. सी. भवन येथून या रॅलीला सुरुवात होणार असल्याची माहिती अभिमानस ग्रुपचे गौरव सांगले व गौरव कोल्हापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गौरव सांगले म्हणाले, कारगील विजय दिनाबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही या २५ दिवसीय मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या मोहिमेत ग्रुपमधील २२ ते ५९ वयोगटातील १७ सदस्य सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे ६ हजार ५०० किलोमीटरची ही रॅली आम्ही बुलेटवरून पार करणार आहोत. २६ जुलै रोजी विजय दिनादिवशी आम्ही कारगील मेमोरिअलस्थळी राष्ट्रगीत गाऊन विजय दिन साजरा करणार आहोत. गौरव कोल्हापुरे म्हणाले, २६ जुलै हा विजय दिन साजरा करावा यासाठी आम्ही जिल्ह्यातील अनेक शाळा व गावांना भेट दिली आहे. सर्व मोहिमेसाठी आम्ही कोणाकडून आर्थिक मदत घेतलेली नाही. अनेकजण आमच्या मोहिमेला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांना आम्ही फक्त २६ जुलै रोजी तुमच्या गावातील एका माजी सैनिकांचा सन्मान करा; तसेच विजय दिन साजरा करण्यासाठी प्रबोधन करावे, यासाठी आवाहन करीत आहोत. कारगिल युद्धात भारतीय सैन्याने दाखविलेल्या अलौकिक शौर्याच्या स्मृती अधिक ठळक होण्यासाठी व याबाबत जागृती होण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. पत्रकार परिषदेला डॉ. संदीप पाटील, देवण कोल्हापुरे, प्रदीप घाटगे, यशवंत माने, रामचंद्र कुंभार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) यांचा समावेश श्रीकृष्ण लोहार, अभिजित गुरव, गौरव कोल्हापूरकर, गौरवी सांगले, पराग गांधी, विश्वजित पाटील, सिद्धेश सोपान, यशवंत माने, दीनानाथ पोतदार, रामचंद्र कुंभार, प्रदीप घाटगे, अतुल राजगुरू, चंद्रकांत भालकर, हृषीकेश भांबुरे, रवींद्र लोहार, देवेन कोल्हापूरकर, दिगंबर भोसले हे या बुलेट रॅलीत सहभागी होणार आहेत. देशासाठी किमान हे करा.... २६ जुलै रोजी सर्वांनी किमान दोन मिनिटे स्तब्ध राहून कारगीलमधील शहीद जवानांना आदरांजली वाहावी, तसेच राष्ट्रगीत म्हणावे, यासह रक्तदान किंवा वृक्षारोपण यासारखे कार्यक्रम घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. १३ जुलै रोजी कोल्हापुरातील एनसीसी भवन येथून या रॅलीला सुरुवात मोहिमेत ग्रुपमधील २२ ते ५९ वयोगटातील १७ सदस्य सहभागी होणार
बुलेटवरून कोल्हापूर-कारगील धाडसी मोहीम
By admin | Published: July 09, 2015 1:02 AM