Kolhapur North By Election: उत्तर कोल्हापुरात काँग्रेस सुस्साट; भाजपची पिछेहाट, साडे सात हजार मतांनी पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 08:41 AM2022-04-16T08:41:18+5:302022-04-16T09:09:17+5:30

Kolhapur North By Election Result: आज बारा वाजता उडणार गुलालाचा धुरळा; कोल्हापूर उत्तरची मतमोजणी, निकालाकडे राज्याचे लक्ष

Kolhapur North By Election Result BJPs Satyajit vs MVA candidate Jayashree Jadhav | Kolhapur North By Election: उत्तर कोल्हापुरात काँग्रेस सुस्साट; भाजपची पिछेहाट, साडे सात हजार मतांनी पिछाडीवर

Kolhapur North By Election: उत्तर कोल्हापुरात काँग्रेस सुस्साट; भाजपची पिछेहाट, साडे सात हजार मतांनी पिछाडीवर

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीतील ३५८ मतदान यंत्रांतील मतमोजणीचे केलेले नियोजन पाहता आज, शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. प्रचाराची घसरलेली पातळी, आरोपप्रत्यारोपाने उडालेला धुरळा, भाजपाने शेवटच्या टप्प्यात आणलेला हिंदुत्वाचा मुद्दा, यामुळे ही निवडणूक कमालीची चुरशीची झाली होती. म्हणूनच आज होत असलेल्या मतमोजणीकडे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भाजपाचेसत्यजित कदम यांच्यामध्ये ही लढत होत आहे. एकूण पंधरा उमेदवार रिंगणात आहेत.

तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. जयश्री जाधव यांना आतापर्यंत १५ हजार २९९, तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ७ हजार ७९८ मतं मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसची आघाडी साडे सात हजार मतांपेक्षा अधिक आहे.

राजाराम तलाव परिसरात असलेल्या शासकीय गोदाम, तसेच प्रशासकीय इमारतीत पोटनिवडणुकीची मतमोजणी होत आहे. त्याची तयारी तसेच रंगीत तालीमदेखील पार पडली. मतमाेजणीसाठी पंधरा टेबलांची मांडणी करण्यात आली आहे. एका टेबलवर सर्वप्रथम पोस्टल मतदान मोजण्यात येणार आहे. त्यानंतर चौदा टेबलवर ईव्हीएम मशीनमधील मते मोजली जातील. मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या होणार आहेत. एका फेरीला दहा मिनिटे गृहीत धरली, तर पाच तासांत ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.

मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी मिळून ७६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक याप्रमाणे उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना प्रवेश दिला जाईल. मतमोजणी कक्ष, तसेच बाहेरील परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, तसेच परिसरात प्रतिनिधी, अधिकाऱ्यांना बसण्यासाठी मंडपही उभारण्यात आले आहेत. मतमोजणीदरम्यान परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी राज्य व केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे.

कुणी कुठे थांबायचे..?
मतमोजणीच्या काळात, तसेच निकाल लागल्यानंतर काही गडबड गोंधळ होऊ नये, याची खबरदारी घेताना पोलिसांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबण्यास सांगितले आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना रजपूतवाडी एचपी गॅस गोडाऊनजवळ, भाजपाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी विद्यापीठ यूथ बँकेजवळ, तर वंचित आघाडीसह अन्य उमेदवारांना शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाजवळ थांबण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

पाच टक्के व्हीव्ही पॅटमधील मोजणी
मतमोजणीवेळी ईव्हीएममधील मतदानाची मोजणी तर होईलच. शिवाय नियमानुसार पाच टक्के व्हीव्हीपॅटमधील मतपत्रिकांचीही मोजणी होणार आहे. पाच टक्के याप्रमाणे १८ व्हीव्हीपॅटमधील मतपत्रिकांची मोजणी होईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Kolhapur North By Election Result BJPs Satyajit vs MVA candidate Jayashree Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.