शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

Kolhapur North By Election: उत्तर कोल्हापुरात काँग्रेस सुस्साट; भाजपची पिछेहाट, साडे सात हजार मतांनी पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 8:41 AM

Kolhapur North By Election Result: आज बारा वाजता उडणार गुलालाचा धुरळा; कोल्हापूर उत्तरची मतमोजणी, निकालाकडे राज्याचे लक्ष

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीतील ३५८ मतदान यंत्रांतील मतमोजणीचे केलेले नियोजन पाहता आज, शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. प्रचाराची घसरलेली पातळी, आरोपप्रत्यारोपाने उडालेला धुरळा, भाजपाने शेवटच्या टप्प्यात आणलेला हिंदुत्वाचा मुद्दा, यामुळे ही निवडणूक कमालीची चुरशीची झाली होती. म्हणूनच आज होत असलेल्या मतमोजणीकडे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भाजपाचेसत्यजित कदम यांच्यामध्ये ही लढत होत आहे. एकूण पंधरा उमेदवार रिंगणात आहेत.तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. जयश्री जाधव यांना आतापर्यंत १५ हजार २९९, तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ७ हजार ७९८ मतं मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसची आघाडी साडे सात हजार मतांपेक्षा अधिक आहे.

राजाराम तलाव परिसरात असलेल्या शासकीय गोदाम, तसेच प्रशासकीय इमारतीत पोटनिवडणुकीची मतमोजणी होत आहे. त्याची तयारी तसेच रंगीत तालीमदेखील पार पडली. मतमाेजणीसाठी पंधरा टेबलांची मांडणी करण्यात आली आहे. एका टेबलवर सर्वप्रथम पोस्टल मतदान मोजण्यात येणार आहे. त्यानंतर चौदा टेबलवर ईव्हीएम मशीनमधील मते मोजली जातील. मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या होणार आहेत. एका फेरीला दहा मिनिटे गृहीत धरली, तर पाच तासांत ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.

मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी मिळून ७६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक याप्रमाणे उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना प्रवेश दिला जाईल. मतमोजणी कक्ष, तसेच बाहेरील परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, तसेच परिसरात प्रतिनिधी, अधिकाऱ्यांना बसण्यासाठी मंडपही उभारण्यात आले आहेत. मतमोजणीदरम्यान परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी राज्य व केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे.

कुणी कुठे थांबायचे..?मतमोजणीच्या काळात, तसेच निकाल लागल्यानंतर काही गडबड गोंधळ होऊ नये, याची खबरदारी घेताना पोलिसांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबण्यास सांगितले आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना रजपूतवाडी एचपी गॅस गोडाऊनजवळ, भाजपाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी विद्यापीठ यूथ बँकेजवळ, तर वंचित आघाडीसह अन्य उमेदवारांना शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाजवळ थांबण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

पाच टक्के व्हीव्ही पॅटमधील मोजणीमतमोजणीवेळी ईव्हीएममधील मतदानाची मोजणी तर होईलच. शिवाय नियमानुसार पाच टक्के व्हीव्हीपॅटमधील मतपत्रिकांचीही मोजणी होणार आहे. पाच टक्के याप्रमाणे १८ व्हीव्हीपॅटमधील मतपत्रिकांची मोजणी होईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरBJPभाजपाSatyajit Kadamसत्यजित कदमcongressकाँग्रेस