कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ‘सीबीआय’ने अटक केलेला सनातनशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हा ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील ‘मास्टर माइंड’ असल्याचा संशय आहे. त्याच्याकडून काही महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तावडेच्या अटकेसाठी सत्र न्यायालयाने दिलेल्या मंजुरी आदेशाचे पत्र पुणे न्यायालयासह ‘सीबीआय’ला बुधवारी सादर केले, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ‘सीबीआय’च्या पथकाने डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याला अटक केल्यानंतर, त्याच्या चौकशीमध्ये आठ वर्षांपूर्वीचे कोल्हापूर कनेक्शन पुढे आले. त्याचा पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसंबंधी चौकशी केली असता, अनेक पुरावे ‘सीबीआय’च्या हाती लागले. डॉ. तावडेचा ताबा मिळण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी अर्ज सादर केला होता. त्यास न्यायालयाने मंजुरी दिली. (प्रतिनिधी)
कोल्हापूर पोलिसांना हवा डॉ.तावडेचा ताबा
By admin | Published: June 16, 2016 2:41 AM