कोल्हापूर : कार्बन डायआॅक्साईड वायू शोषून घेऊन आॅक्सिजनचा पुरवठा करणारा शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा कोल्हापूर शहराचे फुप्फुस असल्याचे चित्र समोर आले आहे. या फुप्फुसाची कार्बन शोषून घेण्याची नेमकी क्षमता किती आहे, याचा विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाने शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे.या विभागाने विद्यापीठाच्या ८५२ एकर क्षेत्रांतील वृक्षगणना आणि या वृक्षांच्या प्रजातीनुसार त्यांच्या आणि पर्यायाने संपूर्ण परिसराच्या कार्बन ग्रहण क्षमता मापनाचा शास्त्रीय उपक्रम पूर्ण केला आहे.जागतिक वसुंधरादिनाचे औचित्य साधून २२ एप्रिलपासून या विभागाने सदर वृक्षगणनेला प्रारंभ केला. त्यात परिसरातील सर्व वृक्षांची गणना, प्रजातींची नोंद, त्यांच्या खोडाचा परीघ, उंची या बाबींचे मापन केले. त्यावरून त्यांचे जैव-वस्तुमान (बायोमास) काढण्यात आले. तसेच झाडांचा फुलोरा, फळे, पक्ष्यांची घरटी, मधमाश्यांचे पोळे, कीटकांची नोंद, आदी परिसंस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींचे मापन केले आहे. या अभ्यासातून विद्यापीठ परिसरातील वृक्षसंपदेचे व अनुषंगिक परिसंस्थेच्या सद्य:स्थितीचे आकलन होण्यास मदत झाली. महत्त्वाचे म्हणजे या वृक्षगणनेतून विद्यापीठ परिसराच्या कार्बन ग्रहण क्षमतेचे मापन होऊन हा परिसर हरितगृह वायूंचे शोषण करू शकतो, हे समोर आले आहे. (प्रतिनिधी) वृक्षगणनेची प्रक्रिया झाली अशीविद्यापीठातील या वृक्षगणनेमध्ये चार फुटांपेक्षा उंच आणि दहा सेंटिमीटरपेक्षा अधिक परीघ असलेल्या झाडांची गणना करण्यात आली. पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत, प्रा. आसावरी जाधव, संशोधक विद्यार्थिनी रसिका पडळकर, अनुप गरगटे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. एस्सी. भाग एक आणि दोनच्या ९० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गणनेचे काम केले. ‘गुगल अर्थ’ आणि विद्यापीठाचा नकाशा यांच्या साहाय्याने परिसराचे एकूण ४६ विभाग केले. त्यामध्ये तीन-चार विद्यार्थ्यांचे गट करून ही गणना करण्यात आली. त्यानंतर वृक्षांच्या कार्बन ग्रहण क्षमतेच्या शास्त्रीय विश्लेषणाचे काम करण्यात आले. आढळला ३६३८.३५ टन बायोमासविद्यापीठ परिसरातील मोठ्या झाडांचा ३६३८.३५ टन एवढा बायोमास आढळला आहे. यात शिरीष या झाडाचा बायोमास सर्वाधिक आहे. त्यानंतर आॅस्ट्रेलियन बाभूळ व गिरिपुष्प वनस्पतींचा बायोमास आहे. बायोमासच्या निम्म्या प्रमाणात त्यातील कार्बनसाठा असतो. त्यानुसार विद्यापीठ परिसरात १८१९.१७ टन इतका कार्बनसाठा आहे.वर्षाला २ लाख ८७ हजार कार्बन डायआॅक्साईडचे शोषणविद्यापीठातील मोठ्या झाडांमधील कार्बनसाठ्याच्या माध्यमातून आतापर्यंत ६६७६.३७ टन एवढा हवेतील कार्बन डायआॅक्साईड वायू शोषला गेला आहे. १३ हजार २१७ मोठी झाडे वर्षाला २ लाख ८७ हजार किलो इतका कार्बन डायआॅक्साईड शोषून घेतात. तसेच या झाडांनी १७८०३.६६ टन प्राणवायू उत्सर्जित केला आहे. शिवाय ही झाडे २६ हजार ४३४ लोकांच्या प्राणवायूची गरज भागवितात.आकडेवारी दृष्टिक्षेपात--विद्यापीठ परिसरातील मोजलेल्या एकूण झाडांची संख्या : १३२१७मोजलेल्या व ओळखलेल्या एकूण प्रजातींची संख्या : ९७प्रजातीनुसार झाडांची संख्या ----गिरिपुष्प (४३६८)---सुबाभूळ (१८६९)----नीम (८९८)--निलगिरी (७९८) --रेन ट्री (६८१)
कोल्हापूर : विद्यापीठ बनले शहराचे ‘फुप्फुस’
By admin | Published: September 24, 2014 12:16 AM