भीमगोंडा देसाई, कोल्हापूरराज्यात ‘टँकरमुक्त’ म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ख्याती होती. मात्र, यंदा नियोजनातील ढिसाळपणामुळे इचलकरंजी, कोल्हापूर शहरात काही दिवस टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सुदैवाने दररोज टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ जिल्ह्यात कुठेही उद्भवलेली नाही; पण टंचाईग्रस्त शहरे व वाड्या-वस्त्यांत टंचाई निवारण कृती आराखड्यात पारंपरिक स्रोतांमध्ये पाणी उपलब्ध होईपर्यंत टँकरद्वारे पाणी देणे प्रस्तावित आहे. जिल्ह्यात २०११नंतर कुठेही शासनातर्फे टँकरने पाणीपुरवठा केलेला नाही. त्यामुळे राज्यात कोल्हापूरची ओळख ‘टँकरमुक्त’ म्हणून झाली. मात्र, विहिरी, कुपनलिका, तलाव यातील पाण्याने तळ गाठला आहे. जवळपासचे सर्व नैसर्गिक स्रोत आटल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा करण्याचा उपाय प्रस्तावित केले आहेत.कोल्हापूर शहरातील अनेक भागात काही दिवसांपासून सुरू असलेली गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यादरम्यान पाणीपुरवठा बंद असलेल्या ठिकाणी महानगरपालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला.> ५५ लाखांची तरतूद... : जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण्यासाठीच्या उपाय योजनांसाठी ५५ लाखांची तरतूद केली आहे. खासगी विहीर अधिग्रहण करणे ३ लाख, नवीन विहिरी व कूपनलिका खोदणे ३२ लाख, तात्पुरती पूरक नळ पाणी योजना घेणे २० लाख यासाठी तरतूद आहे.
कोल्हापूरच्या ‘टँकरमुक्त जिल्हा’ ख्यातीला तडा
By admin | Published: May 09, 2016 3:59 AM