शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कोकण विभाग राज्यात प्रथम

By admin | Published: June 07, 2016 7:42 AM

१०वी (एसएससी) शालान्त परीक्षेचा सोमवारी जाहीर झालेल्या निकालानुसार राज्यातील नऊ विभागात कोकण विभागाचा निकाल ९६.५६ टक्के लागला

अलिबाग : मार्च २०१६ मध्ये महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या १०वी (एसएससी) शालान्त परीक्षेचा सोमवारी जाहीर झालेल्या निकालानुसार राज्यातील नऊ विभागात कोकण विभागाचा निकाल ९६.५६ टक्के लागला असून कोकणाने राज्यात प्रथम स्थान संपादन केले आहे. रायगड जिल्ह्याचा निकाल ९१.१२ टक्के लागला. जिल्ह्यातील १५ तालुक्यांत पेण तालुक्याचा निकाल ९३.२१ टक्के लागला असून पेण तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. बारावी परीक्षेप्रमाणेच दहावी शालान्त परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे.रायगड जिल्ह्यातील ५२३ शाळांमधील १९ हजार ६८२ मुले आणि १७ हजार ७२० मुली अशा एकूण ३७ हजार ४०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा फार्म भरले होते. त्यापैकी १९ हजार ६४४ मुले व १७ हजार ६९६ मुली अशा एकूण ३७ हजार ३४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८९.९३ टक्के म्हणजे १७ हजार ६६६ मुले तर ९२.४५ टक्के म्हणजे १६ हजार ३६० मुली असे एकूण ९१.१२ टक्के म्हणजे ३४ हजार ०२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील एकूण उत्तीर्ण ३४ हजार ०२६ विद्यार्थ्यांपैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत ७ हजार २१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांमध्ये प्रथम श्रेणीत १२ हजार ७१२, व्दितीय श्रेणीत ११ हजार ४७६ तर उत्तीर्ण श्रेणीत २ हजार ६२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.रायगड जिल्ह्यातील पेण एज्युकेशन सोसायटीच्या दुर्गम आदिवासी क्षेत्रातील वरसई शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. संस्थेच्या वडखळ येथील जयकिसान विद्यामंदिर शाळेतील १४५ पैकी १४४ विद्यार्थी उत्तीर्ण होवून शाळेचा निकाल ९९.३१ टक्के, नेने कन्या शाळेचा ९७.३६ टक्के, प्रायव्हेट हायस्कूल पेणचा ९८.१२ टक्के तर भाल शाळेचा निकाल ९९ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांची जिद्द आणि शिक्षकांचे परिश्रम यातून हे यश प्राप्त झाले असल्याची माहिती संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान ज्येष्ठ सल्लागार अ‍ॅड.बापूसाहेब नेने यांनी दिली आहे.>स्नेहल वाणी मुरु ड तालुक्यात सर्वप्रथममुरु ड / नांदगाव : सर एसए हायस्कूलमधील विद्यार्थिनी स्नेहल वाणी हिने ९०.४० टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. सिधी मसाल हिने ८७.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. साक्षी कर्णिक हिने ८६.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. >नागोठणे उर्दू हायस्कूलचा १०० टक्के निकालनागोठणे : येथील नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेला शाळेतील ३२ विद्यार्थी बसले होते. ८५ टक्के गुण मिळवून शरमीन अल्ताफ अधिकारी ही विद्यार्थिनी शाळेत पहिली, मजिहा सलाम दफेदार व्दितीय, सुझेन रऊफ बेलोसकर तृतीय आला.>डॉ. पारनेरकर विद्यालयाचा निकाल ७४.७४ टक्केरसायनी : डॉ. पारनेरकर महाराज विद्यालयाचा दहावीचा निकाल ७४.७४ टक्के लागला आहे. मार्च २०१६ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी विद्यालयाचे ९९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम आशुतोष शिर्के ८९ टक्के, द्वितीय मिलिंद कांबेरे ८३.८० तर तृतीय प्रेम घोंगे ८७ टक्के गुण प्राप्त झाले आहेत.>उन्ड्रे इंग्लिश हायस्कूलचा १०० टक्के निकालआगरदांडा : रॉयल एज्युकेशन सोसायटीचे डॉ. ए. आर. उन्ड्रे हायस्कूल राजपुरीचा यंदाचा एसएससीचा निकाल १०० टक्के लागला. प्रथम क्रमांक गौरी चोरघे ९१.६० टक्के गुण, द्वितीय देवश्री साखरकर ८९.६० तर तृतीय श्रुती साखरकर ८२ टक्के गुण मिळविले. यांचे मुख्याध्यापिका रिजवाना हुर्जूक आदींनी अभिनंदन के ले.>पीएनपीच्या शाळांची उत्तुंग भरारी : पी.एन.पी. होली चाईल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल वेश्वी, जीजेएम इंग्लिश मिडीयम स्कूल खालापूर, पी.एन.पी. मराठी माध्यम शाळा पळस, वडघर-पांगलोली, या चार शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून संस्थेमध्ये पी.एन.पी. होली चाईल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल वेश्वी या शाळेचा विद्यार्थी सिद्धार्थ पेठारे याने ९६.४ टक्के गुण संपादन करून पहिला येण्याचा मान पटकाविला आहे. उर्वरित शाळांचे निकाल ८० टक्केच्या वर लागले असून पी.एन.पी. संस्थेचा निकाल ८४ टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, खजिनदार नृपाल पाटील यांनी अभिनंदन केले.>पनवेलच्या मुली हुशार... : दहावीच्या निकालात रायगड विभागात पनवेलने चौथा क्रमांक पटकावला आहे. पनवेलचा निकाल ९२.७२ टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला पनवेल तालुक्यातील १० हजार १३ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ५ हजार ३१८ मुले तर ४ ६९५ मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी ९ हजार २६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ७५० विद्यार्थी नापास झाले आहे. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे बारावीच्या निकालासारखेच मुलींनी पुन्हा पहिला येण्याचा बहुमान मिळवला आहे. >कोएसोचा निकाल ८८.३० टक्के कोकणातील मोठी शिक्षण संस्था असणाऱ्या कोकण एज्युकेशन सोसायटीचा निकाल ८८.३० टक्के लागला आहे. संस्थेच्या ४६ मराठी माध्यमाच्या व ६ इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या एकूण ५२ शाळांमधील ५ हजार २३३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ८८.३० टक्के म्हणजे ४ हजार ६२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कोएसोच्या कुडाळ-सिंधुदुर्ग येथील यशवंत परब विद्यालय व पेण तालुक्यातील वढाव येथील बळीराम ठाकूर विद्यालय या मराठी माध्यमाच्या दोन शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. इंग्रजी माध्यमाच्या पेझारी माध्यमिक शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. ५२ शाळांपैकी ७८ टक्के शाळांचा निकाल ८० ते ९९ टक्के आहे.