शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

Konkan Railway: दिवाळीसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

By कमलाकर कांबळे | Published: October 14, 2023 7:14 PM

Konkan Railway Special trains: कोकण रेल्वने दिवाळीसाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने हा निर्णय घेण्यात आला.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई - कोकण रेल्वने दिवाळीसाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत या विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.लोकमान्य टिळक टर्मिनल ते मंगळुरू जंक्शन (०११८५) ही विशेष साप्ताहिक गाडी २० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी रात्री १०:१५ वाजता मुंबईहून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:०५ मिनिटांनी मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. त्याचप्रमाणे मंगळुरू जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनल (०११८६) ही विशेष साप्ताहिक गाडी २१ ऑक्टोबर ते २ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी सायंकाळी ६:४५ वाजता मंगळुरू स्थानकातून सुटणार आहे. गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी २:२५ वाजता लोकमान्य टिळक स्थानकावर पोहोचणार आहे. दोन्ही मार्गांवरून धावणाऱ्या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुक्काम येथे थांबेल. रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर थांबतील, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेDiwaliदिवाळी 2022