शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

कोकणातील गणेशभक्तांना टोलमाफी!

By admin | Published: August 07, 2015 1:50 AM

कोकणात गणेशोत्सवाकरिता जाणाऱ्या गणेशभक्तांच्या खासगी वाहनांच्या रांगा टोलनाक्यावर लागून वाहतूक खोळंबा होऊ नये याकरिता १३ ते १६ सप्टेंबर या काळात गणेशभक्तांना टोलमाफी देण्यात येईल

मुंबई : कोकणात गणेशोत्सवाकरिता जाणाऱ्या गणेशभक्तांच्या खासगी वाहनांच्या रांगा टोलनाक्यावर लागून वाहतूक खोळंबा होऊ नये याकरिता १३ ते १६ सप्टेंबर या काळात गणेशभक्तांना टोलमाफी देण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या एसटी बस व खासगी गाड्या यांना पुरवायच्या सेवासुविधांबाबत सर्व संबंधित मंत्र्यांची गुरुवारी बैठक झाली. त्यानंतर रावते यांनी निर्णयांचा माहिती दिली. रावते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करून निर्णय घेतला आहे. तसेच याच कालावधीत मुंबईपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत ट्रक, कंटेनर अशा अवजड वाहनांची वाहतूक बंद केली जाणार आहे. रावते म्हणाले की, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांकरिता यंदा एसटीच्या २३५० बसगाड्या सोडण्यात येतील. ६० ते ७० हजार खासगी वाहने याच कालावधीत कोकणात जातात. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्याकरिता वाहतूक पोलिसांच्या सायरन असलेल्या गाड्यांसोबत एसटी वाहतूक केली जाईल.यंदा कुंभमेळा व गणेशोत्सव एकाचवेळी आहे. त्यामुळे कुंभमेळ्याकरिता लोकांना सोडायला गेलेल्या १४०० एसटी बस वाहतूक पोलिसांच्या देखरेखीखाली १३ तारखेला मुंबईत आणण्यात येतील व त्यानंतर त्या कोकणाकडे सोडण्यात येतील. ज्या दिवशी नाशिकमधून या एसटी बस आणण्यात येतील त्या दिवशी नाशिक-मुंबई रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद केली जाईल, असे रावते यांनी सांगितले.