- अरुण वाघमोडेअहमदनगर : कोपर्डीमध्ये १३ जुलै २०१६ रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करु न निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघाले होते. या प्रकरणी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक झाली होती. न्यायालयात खटलादाखल झाल्यानंतर एक वर्ष चार महिन्यांत निकाल आला.या गुन्ह्यातील मुख्य दोषी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २५,कोपर्डी) याला बलात्कार व खून या गुन्ह्यांसाठी तर संतोष गोरख भवाळ (वय ३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (वय २६) यांना या कटात सहभागी असल्याच्या कारणावरुन फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सकाळी साडेअकरा वाजता शिक्षा सुनावण्याचे कामकाज सुरु झाले. यावेळी न्यायदान कक्ष गर्दीने तुडूंब भरला होता. न्यायाधीशांनी तिनही आरोपींना आरोपी बसण्याच्या जागेवरुन न्यायपिठासमोर बोलावले. त्यानंतर निकालपत्र वाचत प्रत्येकाला शिक्षा सुनावली.न्यायदानकक्षात पहिल्याच रांगेत पीडितेची आई, बहीण, भाऊ व इतर नातेवाईक निकाल ऐकण्यासाठी उपस्थित होते. निकाल ऐकताच त्यांना अश्रू अनावर झाले. सकाळपासूनच न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त होता.दोषींचे चेहरे निर्भावशिक्षा सुनावली तेव्हा आरोपींच्या चेहºयावर काहीही भाव नव्हते. शिक्षेचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळपर्यंत आरोपींना न्यायालयाच्या इमारतीतील कोठडीत ठेवले गेले. कोठडीत ते निशब्द होऊन फेºया मारत होते. दोषी धरले त्यादिवशी हे तिनही आरोपी हंबरडा फोडून रडले होते. बुधवारी मात्र त्यांची काहीच प्रतिक्रिया नव्हती.संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाºया कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खून खटल्यात जिल्हा न्यायालयाने बुधवारी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. या निकालाचे पीडित मुलीच्या परिवारासह विविध स्तरातून स्वागत होत आहे.काय आहे नेमके प्रकरणकोपर्डी येथील नववीत शिकणारी निर्भया (नाव बदललेले) गतवर्षी १३ जुलैला सायंकाळी साडेसहा वाजता मसाला आणण्यासाठी सायकल घेऊन घराबाहेर पडली होती. त्यावेळी जितेंद्र शिंदे याने तिला रस्त्यात अडवून बलात्कार व निर्घृण खून केला़याप्रकरणी मुलीच्या मावसभावाने फिर्याद दिलीहोती. घटनेनंतर पोलिसांनी शिंदे याच्यासह संतोष भवाळ व नितीन भैलुमेला अटक केली.या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी तपास करून ७ आॅक्टोबर २०१६ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी खटला लढविला.पुराव्यांची साखळी करून गुन्हा सिद्धकोपर्डी खटल्यात प्रत्यक्षदर्शनी एकही पुरावा नव्हता़ परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी तयार करून न्यायालयात गुन्हा सिद्ध केला. या प्रकरणात पोलीस यंत्रणेनेही चांगले काम केले़ ग्रामीण भागात शालेय मुलींबाबत छेडछाडीच्या घटना घडतात़ शाळा बंद होईल या भितीपोटी त्या बोलत नाहीत. मात्र, मुलींनी निर्भय होऊन या प्रकारांबद्दल वाच्यता करणे आवश्यक आहे. त्यातून पुन्हा अशा घटना घडणार नाहीत.- अॅड़ उज्ज्वल निकम,विशेष सरकारी वकीलनिर्भयाची आई म्हणते,माझ्या छकुलीला न्याय मिळालान्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा यात खूप मोठा वाटा आहे. तपास अधिकारी, सर्व पोलीस यंत्रणा यांनी जोमाने तपास केला. मराठी समाज, संघटना, विद्यार्थी आमच्या मागे उभे राहिले. सर्वाच्या प्रयत्नाने माझ्या छकुलीला न्याय मिळाला. पहिली लढाई आम्ही जिंकली आहे. न्यायासाठी सगळ्या न्यायालयात लढेन. हे नराधम जोपर्यंत फासावर लटकत नाहीत, तोपर्यंत लढा देईल. यापुढे कोणत्याही छकुलीवर असा प्रसंग ओढवला तर तिच्यासाठी मी धावून जाईन.निर्भयाचे वडील म्हणतात,तेव्हाच मिळेल छकुलीच्या आत्म्याला शांतीअखेर न्याय मिळाला. न्यायालय,सरकारी वकील उज्ज्वल निकम, तसेच जो समाज आमच्या मागे अखेरपर्यंत उभा राहिला त्या सर्वांचे आभार. आमची पोरगी तर आता परत येणार नाही, पण अशा शिक्षेमुळे कोणत्याही नराधमाची मुलींकडे वाकडी नजर करून बघायची हिंमत होणार नाही. ज्या दिवशी नराधम फासावर लटकतील त्या दिवशी छकुलीच्या आत्म्याला शांती मिळेल.निकाल मान्यकोपर्डी खटल्यातील आरोपी क्रमांक एक जितेंद्र शिंदे याच्यावतीने खटला लढविण्यासाठी विधीसेवा न्याय प्राधिकरणाने माझी नियुक्ती केली होती़ या खटल्यात न्यायालयाने दिलेला निकाल मान्य आहे़- अॅड़ योहान मकासरे,जितेंद्र शिंदे याचे वकील
कोपर्डी खटला : नराधमांना फाशीच, जिल्हा न्यायालयाच्या निकालाचे सर्वत्र स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:19 AM