ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ : अहमदनगरमधील कोपर्डीतील बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. या कुटुंबियाला मुख्यमंत्री सहायता निधी मधून ५ लाख रुपये तर मनोधैर्य योजनेतून 3 लाखांची मदत करण्यात येणार आहे. या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देखील देण्यात आलं आहे.
दरम्यान, अहमदनगर बलात्कार प्रकरण खटला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम लढणार आहेत. कोपर्डी ग्रामस्थांनी हा खटला उज्ज्लव निकम यांनी लढवावा अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उज्ज्वल निकम यांना हा खटला लढवण्याची विनंती केली होती. ही विनंती उज्ज्वल निकम यांनी स्वीकारली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणआर आहे.
Link of Statement by CM @Dev_Fadnavis in legislative assembly today, on Kopardi Case https://t.co/0FbPofNg6M— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2016