शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

कोरेगाव भीमा हिंसाचार : आरोपींच्या जामिनावरील निकाल उच्च न्यायालयाने ठेवला राखून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 1:00 AM

आपल्याविरोधात कोणतेही थेट पुरावे पोलिसांच्या हातात नाहीत.

मुंबई : एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेले वर्नोन गोन्साल्विस, अरुण फरेरा आणि सुधा भारद्वाज यांच्या जामीन याचिकांवरील निर्णय उच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला.आपल्याविरोधात कोणतेही थेट पुरावे पोलिसांच्या हातात नाहीत. मार्क्सवादी विचारधारांची पुस्तेक, सीडी बाळगणे म्हणजे गुन्हा नाही, असा युक्तिवाद तिघांच्याही वकिलांनी न्या. सारंग कोतवाल यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे केला.सीपीआय (एम) निधी पुरवित असलेल्या गटातील सदस्य असलेल्याचा आरोप असलेल्या सुधा भारद्वाज, अरूण फरेरा आणि वर्नोन गोन्साल्विस यांनी जामिनासाठी उच्च न्यायालायत अर्ज केले. एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी या तिघांसह आणखी काही कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.सरकारी वकिलांनी तिघांच्याही जामीन याचिकांना विरोध केला. याप्रकरणाचा तपास सुरूच आहे आणि या तिघांची जामिनावर सुटका केल्यास तपासासाठी हानीकारक असेल, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.‘कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या कटापलिकडेही हा कट आहे. सीपीआय (एम) निधी पुरवित असलेल्या फ्रंटल गटाचे हे सदस्य आहेत. सीपीआय (एम) वर केंद्र सरकारने २२ जून २००९ रोजी अधिसूचना काढून बंदी घातली आहे. आरोपी केवळ सीपीआय (एम) ची विचारधारा पसरवण्यासाठी केवळ सहाय्य करत नाही तर लोकांना प्रवृत्तही करत आहेत,’ असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.पोलिसांनी जमा केलेले सीडीआर, आरोपींमध्ये झालेला पत्रव्यवहार यावरून हेच स्पष्ट होते की, ओरोपी बंदी घातलेल्या संघटनेचे निष्क्रीय नाही तर सक्रीय सदस्य होते. ते लोकांना गटामध्ये भर्तीही करून घेत, असे सरकारी वकिलांनी सांगितले. न्या. कोतवाल यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत या याचिकांवरील निर्णय राखून ठेवला.

टॅग्स :Courtन्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार