पुणे - कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता,यात आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा यामध्ये काहीही संबंध नाही, असा अहवाल पुण्यात सत्यशोधन समितीने पत्रकार परिषदेत सादर केला आहे. या हिंसाचारामागील सूत्रधार अनुषंगाने 31 डिसेंबरला शनिवरवाड्यावरील एल्गार परिषद आयोजक असलेल्या कबीर कला मंच,रिपब्लिकन पँथर या संशयित गटाची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एटीएसने जानेवारी महिन्यात अटक केलेल्या संशयित माओवादी कोरेगाव भीमा गेले असल्याचे व एल्गार परिषद आयोजक सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एल्गार परिषद व कोरेगाव हिंसाचाराचे लागेबांधे आहेत त्यांची चौकशी करावी, असा मुद्दा समितीने उपस्थित केला. वादग्रस्त व खोटा इतिहास सांगणारा फलक लावण्यात आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे पोलीस अधिकारी व पोलीस यांची चौकशी करून कारवाई करावी, असेही या अहवालात म्हटले आहे.पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली असती तर कोरेगाव भीमा प्रकरण घडले नसते. पोलीस खात्याने कोरेगाव भीमा प्रकरणात नांगरे पाटील, सुएझ हाक एसपी यांच्यासह अधिकाऱ्याने गृहखाते आणि मुख्यमंत्र्याची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करावी, असेही यावेळी सांगण्यात आले.