संदीप झिरवाळ, आॅनलाईन लोकमत, नाशिक : आठवडाभरामध्ये तीन ते चार दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला राहिल्यामुळे त्याचा फटका शेतमालाला बसला आहे. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणल्यामुळे कोथिंबिरला अवघा प्रती जुडी एक रुपया असा बाजारभाव मिळाला. यामुळे बळीराजाने पुन्हा संताप व्यक्त केला आहे. रविवारी (दि.२७) बाजार समितीत झालेल्या लिलावादरम्यान बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरला. रविवारी हजार रुपये शेकड्यावरुन थेट शंभर रुपये शेकड्यावर दर घसरले.बाजारसमितीत दोन महिन्यांपुर्वी तब्बल १८७ रूपये प्रति जुडी असा कोथिंबीरने उच्चांक गाठला होता. शनिवारच्या दिवशी सायंकाळी लिलावात कोथिंबीरच्या प्रतीजुडीला चक्क १रूपया असा मातीमोल बाजारभाव मिळाल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्च तर लांबच वाहतूक खर्चही सुटला नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांनी दिल्या.
नाशिकच्या बाजारात कोथिंबिरची जुडी चक्क एक रुपयाला..! लीलावात मिळाला कवडीमोल भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 7:57 PM
रविवारी (दि.२७) बाजार समितीत झालेल्या लिलावादरम्यान बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरला. रविवारी हजार रुपये शेकड्यावरुन थेट शंभर रुपये शेकड्यावर दर घसरले.
ठळक मुद्देलिलावादरम्यान बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरला १ हजार ते पंधराशे रूपये शेकडा असा बाजारभाव मिळत होता. तीप्पट कोथिंबीरची आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले उत्पादन खर्च तर लांबच वाहतूक खर्चही सुटला नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया