राजरत्न सिरसाटअकोला, दि. १३ : विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांसह इतर ११२ नियमित रिक्त जागा भरण्यात असून यासाठी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मुलाखती घेण्यात येत आहेत. या रिक्त जागांबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला होता हे विशेष.प्रत्येक जिल्ह्यातील शेतकर्यांना कृषी अडचणीविषयक अचूक माहिती व शंका निरसनासाठी राज्यात कृषी विज्ञान केंद्राची (केव्हीके) स्थापना करण्यात आली; परंतु विदर्भ याला अपवाद ठरत असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या सात कृषी विज्ञान केंद्रांतील ८0 टक्के शास्त्रज्ञ, कर्मचार्यांच्या जागा रिक्त असल्याने शेतकर्यांना अद्ययावत माहिती पुरविण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे वृत्त लोकमतने ८ मेच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत भारतीय कृषी संशोधन परिषदेने लवकरच रिक्त जागा भरण्याचे आदेश निघणार असल्याची माहिती त्यावेळी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) शास्त्रज्ञ डॉ. राजेंदर जी. रेड्डी यांनी लोकमतला दिली होती. भारतीय कृषी संशोधन परिषदेने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत सात कृषी विज्ञान केंद्रे आहेत. या प्रत्येक जिल्हय़ातील शेतकर्यांना त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठीचे प्रयत्न केले जातात. या केंद्रांतर्गत प्रत्यक्ष शेतात जाणार्या कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. या सात कृषी विज्ञान केंद्रांतर्गत जवळपास ११२ जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी प्रयत्न झाले; पण महाराष्ट्र कृषी संशोधन परिषदेंतर्गत जागा भरण्याचा प्रस्ताव प्रलंबित होते. त्यामुळे कृषी विद्यापीठाने त्यांच्या आस्थापनेवरील शास्त्रज्ञ, कर्मचार्यांना या जागांवर तात्पुरती नेमणूक केल्याने कृषी विद्यापीठाच्या नियमित कामावर त्याचे परिणाम झाले होते. या पृष्ठभूमीवर राज्य शासन व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने दखल घेत या जागा भरण्याचे पाऊल उचलले असून, सोमवारपासून कनिष्ठ व वरिष्ठ संशोधन सहायक ांची पदे भरण्यासाठीच्या मुलाखती घेण्यात येत आहेत.*प्रत्येक जिल्ह्यातील शेतकर्यांना कृषी अडचणीविषयक अचूक माहिती व शंका निरसनासाठी राज्यात कृषी विज्ञान केंद्राची (केव्हीके) स्थापना करण्यात आली आहे. रिक्त जागा भरण्यात येत असल्याने शेतकर्यांच्या शेतीविषयक अडचणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सध्या केव्हीकेची कामे बघत आहेत. त्यांच्यावरील कामाचा भार कमी होईल व कृषी विद्यापीठाचे मनुष्यबळ वाढेल.- डॉ.व्ही.एम. भाले,अधिष्ठाता (कृषी),डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
केव्हीकेच्या ११२ जागा भरणार !
By admin | Published: September 14, 2016 12:35 AM