ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 10 - हाताला काम मिळेल, अशी बतावणी करून एका मुकडदमने (ठेकेदार) दीड वर्षापूर्वी शिरपूर तालुक्यातील खामखेडा व परिसरातील मजुरांची फसवणूक करून त्यांना कर्नाटक राज्यातील बेणुरपांडा येथे नेले. तेथे दुसऱ्या एका मुकडदमने मजुरांवर अमानुषपणे अत्याचार केला. त्यांना योग्य तो मोबदला दिला नाही. दिवस-रात्र राबवून घेतले, अशी धक्कादायक आपबिती मजुरांनी सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत कथन केली. त्यांची सुटका भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या प्रयत्नाने झाली आहे, असे संजय मंगल भील (रा. खामखेडा) या युवकान सांगितले. येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयात पत्रपरिषद झाली.राहुरीऐवजी बेणूरपांडा येथे नेले शिरपूर तालुक्यातील निमझरी, खामखेडा, सत्रासेन, आंबे आदी गावातील लोक पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकतात़ ही संधी साधून या गावातील ३० ते ३५ लोकांना शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथील मुकडदम अशोक भील याने राहूरी येथे ऊस तोडणीसाठी घेऊन जाण्याचे त्यांना सांगितले. मात्र, त्याने तसे न करता त्याने त्या मजुरांना चक्क कर्नाटक राज्यातील बेणूरपांडा येथे नेले. दरम्यान, संबंधित मुकडदम अशोक भील याने अॅडव्हान्स पोटी मोठी दुसऱ्या ठेकेदाराकडून रक्कम घेतली होती. त्यामुळे अशोक भिल याने बेणुरपांडा येथील ठेकेदारांकडे मजुरांना सुपूर्द करून तेथून पसार झाला. मात्र, त्यानंतर तो कधीच परतला नाही. सकाळ-सायंकाळी फक्त एक टोमॅटो व बटाटे दिले जायचेबेणूरपांडा येथील मुकडदम निळकंठ ईश्वर राठोड याने या सर्वांना नजर कैदेत ठेवले होते. पैसे न देता डांबून ठेवत त्यांच्याकडून हा ठेकेदार दिवसभर कामे करून घेत होता. त्याचे मजुरांच्या कामावर नियमित लक्ष असल्यामुळे मजुरांना तेथून कुठेच जाण्याची संधी मिळत नव्हती. सकाळी व सायंकाळी मजुरांना फक्त १ टोमॅटो व १ बटाटा त्यांना खायला दिला जात होता. विशेषत: १० वर्षाच्या आतील चिमुकले मुलांकडून देखील शेतीचे कामे तो करून घेत होता. काम न केल्यास मारून टाकण्याची धमकी तो देत होता. येथील ठेकेदार राठोड याच्याकडून अशोक भिल याने पैसे घेतले होते. त्यामुळे तुम्हास सर्वांना येथे अनेक वर्षे कामे करावी लागतील असे तो मजुरांना नेहमी सांगत होता. काम केले नाही तर किडनीदेखील काढून घेण्याची तो धमकी देत असल्यामुळे या मजुरांच्या निरागस मुलांवर अशी वेळ येऊ नये, म्हणून मजून राठोड या ठेकेदाराने सांगितलेले कामे मजूर करत होते. अनेकदा मुकडदम राठोड व त्यांचा भाऊ पिंटू राठोड हे मजुरांसोबत आलेल्या महिलांवर वारंवार अत्याचार करीत होते. भाजपाच्या तालुकाध्यक्षांनी घेतला पुढाकार अखेर रोहिणीचे उपसरपंच बन्सीलाल प्रताप बंजारा यांनी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांना घटनेविषयी माहिती दिली. याच काळात ते निवडणुकीनिमित्त खामखेडा गावाकडे गेले असताना त्यांना बहुतांशी लोकांनी या घटनेबाबत मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती़ दरम्यानच्या काळात फुलाबाई कमल भील रा़निमझरी हल्ली बेणूरपांडा (कर्नाटक) या महिलेस संबंधित ठेकेदाराने येथे संपर्क साधण्यास सांगून पती मेला असून त्याचे प्रेत घेण्यासाठी येथे यावे असे सांगितले़ मात्र, यासंदर्भात राहुल रंधे यांना सांगण्यात आले. त्यांनी महिलेचा पती खरच मेला आहे की नाही? याची खात्री करण्यासाठी सोलापूर येथील मित्रांना पाठविले़ मात्र प्रत्यक्षात तसे काहीच घडले नव्हते़ ...तरच मजुरांना पाठवणार गेल्या महिन्यात उपसरपंच बन्सीलाल बंजारा हे बेणूरपांडा येथे ४-५ जणांसह तेथे गेलेत़ संबंधित ठेकेदार राठोड याने मुकडदम अशोक भील यास आणा आणि हे मजूर घेवून ज्या असे सांगितले़ इंडी पोलिसांनी दिली नाही दाद राहुल रंधे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक चैतन्या एस़ यांच्या कानावर ही घटना टाकली़ जिल्हा पोलिस अधिक्षकांनी लागलीच सांगवी पोलिस ठाण्याला आदेश देवून ३ कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविण्याचे आदेश दिले. गेल्या आठवड्यात रोहिणीचे उपसरपंच बन्सीलाल पावरा हे ३ पोलिस कर्मचाऱ्यांसोबत रवाना झालेत़ इंडी पोलिस ठाण्यात गेल्यावर तेथील प्रशासनाने दाद दिली नाही़ त्या पोलिसांची मदत न मिळाल्यामुळे हे घटनास्थळी रवाना झाले असता तेथे कुणीच मिळून आले नाहीत़ परत ते रात्रीच्या वेळी इंडि पोलिस ठाण्यात आले़ सदरील पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी ३० लाखांचा बाँड लिहून द्या मगच त्या १८ लोकांची सुटका करतो असे सांगितले़ शेवटी बिजापूर येथे जावून तेथील जिल्हा पोलिस अधिक्षकांना रोहिणीचे उपसरपंच बन्सीलाल प्रताप बंजारा जावून भेटले. त्यांचा सहायक सचिव हा महाराष्ट्रीयन असल्यामुळे त्यास सर्व हकीगत सांगितली़ त्यांनी लगेच एसपींना सांगितले़ एसपींनी देखील काही क्षणातच त्या लोकांची सुटका करण्याचे आदेश दिले. याकामी सांगवी पोलिस ठाण्याचे सपोनि रविंद्र देशमुख, उपसरपंच आबा वाणी यांचे सहकार्य लाभले़ सांगवी पोलिस ठाण्यातील तिघे कर्मचाऱ्यांनी वेळ न बघता त्या गावी रात्रीच्या रात्री गेलेत़ तेथून त्या मजुरांना ताब्यात घेवून ते इंडी येथे आले. तेथे सुध्दा या मजुरांना येवू न देण्यासाठी त्रास दिला जात होता़ अखेर ते रेल्वने सोलापूर, मुंबई येथे आलेत़ सोमवारी पहाटेच्या सुमारास ते १८ जणांसह गावी परतले. तब्बल दीड वर्षानंतर अत्याचार व अन्यायग्रस्त स्त्री-पुरूषांची सुटका झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलल्याचे दिसून आले. चार जणांनी पळून केली सुटकागेल्या तीन महिन्यापूर्वी, संजय भील याच्यासोबत १ पुरूष व २ महिला असे ४ जण तेथून पळून आलेत़ बेणूरपांडा येथून ते रात्रीच्या रात्री इंडी येथे आलेत़ दुसऱ्या दिवशी पहाटे पायी-पायी पोहचल्यानंतर ते दिवसभर झाडाझुडपात लपून राहिलेत़ जेणेकरून ते सापडू नये म्हणूऩ रात्रीच्यावेळी ते इंडी येथील रेल्वे स्टेशनला आल्यानंतर ते बंगळुरू सोलापूर या रेल्वेत विना तिकिट प्रवास केला़ त्यांच्याकडे एकही पैसा नव्हता, भुकेले होते़ सोलापूरहून ते पुणे येथे आलेत, पुण्याहून कल्याणला आलेत़ तेथे काही दिवस काम केल्यानंतर पैसा गोळा झाल्यानंतर ते त्यांच्या गावाकडे आले़ गावातील लोकांना त्यांनी घटना कथन केली़ लोकप्रतिधिनींना सुध्दा घटना लक्षात आणून दिली, तरीही त्यांनी सहकार्य केले नाही़१८ अत्याचारग्रस्त मजुरांची नावे अशी संजय मंगल भील २२, मंगल बालू भील ५५, कल्पना अंबरसिंग भील ३०, मंगल उत्तम भील ३०, कालू उत्तम भील २८, शोभाबाई मंगल भील २५, गोबडू मंगल भील १०, श्रावण मंगल भील ८, दीदी मंगल भील ४, बापू भगवान भील ३५, आशाबाई बापू भील ३०, करण बापू भील १०, राजू बापू भील ५, माया बापू भील ४, फुलाबाई कमल भील ३०, विशाल कमल भील १०, तुषार कमल भील ६, काजल कमल भील १२ असे १८ सर्व राहणार खामखेडा प्ऱआंबे ता़शिरपूऱ
दीड वर्षानंतर मजुरांची सुटका...
By admin | Published: October 10, 2016 7:58 PM