शिवाजी गोरे- दापोली -रत्नागिरी जिल्ह्यात सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी मुंबई, पुणे येथील लॅबचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे तपासाला अडचणी येऊन विलंब होतो. भविष्यात जिल्ह्यातील सायबर गुन्ह्याला आळा घालण्यासाठी व बँकिंग क्षेत्रातील ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवून गुन्हेगाराला वेळीच जेरबंद करण्यासाठी दापोली अर्बन बँक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी येथे सायबर लॅब लवकरच सुरू करणार आहे, अशी माहिती दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांनी दिली.रत्नागिरी जिल्ह्यात बँकिंग क्षेत्रात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. दुसऱ्याच्या एटीएममधून पैसे काढणे, बँकेतील एटीएमवर दरोडा घालणे, आदी सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांना मदत व्हावी, गुन्हेगाराला जेरबंद करण्यात कोणती उणीव राहू नये यासाठी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्याशी ार्चा होऊन जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत व्हावी या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. सायबर लॅबमुळे जिल्ह्यातील बँकांतील होणाऱ्या सायबर गुन्ह्यांवर लक्ष ठेवणे सोपे जाणार असून, दापोली अर्बन बँकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सहकार्य लाभणार असून, सायबर लॅबसाठी आर्थिक गरज भासल्यास इतर बँकांचीही मदत घेण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा बँकेच्या बैठकीत अनेक बँकांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे जयवंत जालगावकर म्हणाले. दापोली पोलिसांनी सर्व्हे करून प्रस्ताव दिल्यावर शहराच्या हितासाठी व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही तज्ज्ञांमार्फ त बसविण्यास दापोली अर्बन बँक आर्थिक मदत करेल, असेही जालगावकर म्हणाले.दापोली शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी दापोली अर्बन बँक मदत करणार असून, एसटी स्टॅण्ड, केळस्कर नाका, बुरोंडी नाका, बाजारपेठ या वर्दळीच्या ठिकाणी होणारे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेला सहकार्य व्हावे, गुन्हेगारांचा शोध घेऊन गुन्हेगारीला आळा बसावा, शहरातील चोरी, दरोडे, मारामारी, वाहन पळविणे, बँक लुटून पळणे अशा मुख्य गुन्ह्यांवर पोलिसांची करडी नजर रहावी, यासाठी दापोली अर्बन बँक पोलीस ठाण्याला सीसीटीव्ही बसविण्यासाठी मदत करायला तयार आहे.- जयवंत जालगावकर, अध्यक्ष, दापोली अर्बन बँक
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लॅब
By admin | Published: August 03, 2015 11:34 PM