कोल्हापूर : बंदीजनांकडून देवीसाठीचा लाडूप्रसाद बनविणारे कळंबा कारागृह हे देशातील पहिले कारागृह आहे. बंदीजनांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय आहे. त्याबद्दल मी कोल्हापूरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. सुरुवातीला विरोध झाला; पण लाडूची गुणवता, योग्य वजन, स्वच्छता राखत आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू, अशा शब्दांत कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी मनोगत व्यक्त केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मंगळवारपासून अंबाबाई मंदिरात लाडूप्रसाद वाटपाला सुरुवात झाली. तत्पूर्वी कळंबा कारागृहामध्ये सुरू करण्यात आलेल्या लाडूप्रसाद बनविणाऱ्या युनिटचे व प्रसाद पोहोच करणाऱ्या ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ या व्हॅनचे उद्घाटन साठे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या म्हणाल्या, की आमचे काम बघून झालेला विरोध मावळेल. (प्रतिनिधी)
बंदीजनांकडून लाडूप्रसाद हा ऐतिहासिक निर्णय - स्वाती साठे
By admin | Published: June 15, 2016 3:14 AM