कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवस्थान समितीच्यावतीने देण्यात येणारा लाडूप्रसाद मंगळवारपासून पूर्ववत सुरू होणार आहे. कळंबा कारागृहातील कैदी हे लाडू बनविले असून, येथेच सकाळी ११ वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते या लाडू बनविण्याच्या हॉलचे उद्घाटन होणार आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देवस्थान समितीच्या वतीने लाडूप्रसाद दिला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत लाडूच्या दर्जाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. यापूर्वीच्या ठेकेदाराची लाडूप्रसाद बनविण्याची मुदत चार महिन्यांपूर्वी संपली आहे. त्यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी प्रसादाचे लाडू बनविण्याचे काम कळंबा कारागृहातील कैद्यांकरवी करून घेण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे लाडू बनविण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेण्यात आली आहे. सध्या दिवसाला तीन हजार लाडू बनविण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)
अंबाबाई मंदिरात आजपासून लाडूप्रसाद
By admin | Published: June 14, 2016 3:00 AM