आता अशा 'लाडक्या बहि‍णींना' १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 21:18 IST2025-04-15T21:17:22+5:302025-04-15T21:18:08+5:30

खरे तर, ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्याच महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा महिलांची संख्या जवळपास ८ लाख एवढी आहे. अशा महिलांना पुढील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून केवळ ५०० रुपयेच मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

ladki bahin yojana Now, instead of Rs 1500, such ladki bahin will be given only Rs 500 Ajit Pawar clearly stated | आता अशा 'लाडक्या बहि‍णींना' १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!

आता अशा 'लाडक्या बहि‍णींना' १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!

राज्यातील महायुती सरकारने गेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेची प्रचंड चर्चाही झाली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र आता, नमो शेतकरी योजनेतील पात्र महिलांना, लाडकी बहीण योजनेतून १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यासंदर्भात विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच शब्दात भाष्य केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

खरे तर, ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्याच महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा महिलांची संख्या तब्बल ८ लाख एवढी आहे. अशा महिलांना पुढील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून केवळ ५०० रुपयेच मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

यासंदर्भात विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "आमचे म्हणणे आहे की, यांपैकी कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. केंद्राची योजना ही त्यांना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्था-अर्थी काहीही संबंध नाही. कारण पंतप्रधान मोदीजी यांनी ती देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे. जर असे काही असेल, तर ही ५०० रुपयांची योजना न घेता १५०० रुपयांचा लाभ घ्यावा. कुठला लाभ निवडायचा हे ऐच्छिक. हे आपण लाडक्या बहिणींवर सोपवले आहे."  

अदिती तटकरे यांनीही दिले स्पष्टीकरण -
अदिती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे, "दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे."

अदिती पुढे म्हणाल्या, "एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक ३ जुलै २०२४ नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे."


 

Web Title: ladki bahin yojana Now, instead of Rs 1500, such ladki bahin will be given only Rs 500 Ajit Pawar clearly stated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.