- जमीर काझीमुंबई : साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ या लोकप्रिय नाटकातील लखोबा लोखंडे हे अजरामर पात्र प्रत्यक्षात ठाणे पोलीस दलात अवतरले आहे. येथील एक पोलीस हवालदार एक-दोन नव्हे तर तब्बल सात वेळा बोहल्यावर चढल्याचे उघडकीस आले आहे. पहिल्या पत्नीपासून रीतसर घटस्फोट न घेता त्याने खात्याचा धाक व असाहाय्य महिलांचा गैरफायदा घेत विवाह रचले आहेत.पोलीस नाईक सूर्यकांत काशीनाथ कदम असे त्याचे नाव असून तो मानपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याच्या या गैरवर्तनाबद्दल आयुक्तांनी त्याला निलंबित केले आहे. अधिकाराचा गैरवापर आणि खात्याची प्रतिमा डागाळणारे वर्तन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला आहे. त्याच्या एका पत्नीने त्याबाबत तक्रार दिल्यानंतर झालेल्या विभागीय चौकशीतून त्याचे हे ‘प्रताप’ चव्हाट्यावर आल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.सूर्यकांत कदम याने १९८६ मध्ये पहिल्यांदा वनिता यांच्याबरोबर विवाह केला होता. ड्युटीच्या निमित्ताने पोलीस ठाण्यात येणाºया असाहाय्य तरुणींना तो पदाचा गैरफायदा घेत आमिष दाखवून विवाह करीत असे. पहिल्या पत्नीबरोबर राहत असताना त्याने ३० डिसेंबर २०१२ रोजी अनिता हिच्यासोबत कोल्हापुरातील मंदिरात विवाह केला. त्यानंतर पुढच्याच वर्षी मेघाबाई या महिलेशी तर २५ एप्रिलला मंजिरी हिच्याबरोबर चौथा विवाह केला. त्यानंतर तीन वर्षांनी मनाली नावाच्या तर १२ आॅक्टोबर २०१७ रोजी त्याने जयललिता हिच्यासोबत मंदिरात सहावा विवाह केला. २०१४ मध्ये त्याने श्यामला नावाच्या महिलेबरोबर विवाह केला.साक्षीदारांचे जबाब नोंदविलेसूर्यकांत कदम याच्या सात पत्नींपैकी दोन पत्नी मयत झाल्या आहेत. तर सातव्या पत्नीबरोबर सध्या तो राहत आहे. याबाबत चौकशी अधिकाºयांनी फसवणूक झालेल्या संबंधित महिलांचे तसेच विवाहावेळी उपस्थित असलेल्या सरकारी साक्षीदारांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. सात विवाह करताना कदमने एकीलाही घटस्फोट दिलेला नसल्याचे चौकशीतून पुढे आले आहे, असे चौकशी अधिकाºयांनी सांगितले.
- सध्या सूर्यकांत कदम हा २०१४ मध्ये विवाह केलेल्या श्यामला हिच्यासोबत राहत आहे.पोलीस असल्याने असाहाय्य महिलांचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक करणे अयोग्य आहे. संबंधित पोलिसाचे वर्तन हे नैतिक अध:पतनात मोडत असल्याने खात्याची प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. खात्यात बेशिस्त व गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत.- परमबीर सिंग(पोलीस आयुक्त, ठाणे)