शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

दीड लाखाच्या रोकडसह एटीएम मशीनच लंपास

By admin | Published: March 03, 2017 8:51 PM

दीड लाखाच्या रोकडसह एटीएम मशीनच चोरट्यांनी लंपास केले. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गालगत असलेल्या येथील लाहोटीनगरमध्ये शुक्रवारी

ऑनलाइन लोकमत
मलकापूर (सातारा), दि. 03 - दीड लाखाच्या रोकडसह एटीएम मशीनच चोरट्यांनी लंपास केले. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गालगत असलेल्या येथील लाहोटीनगरमध्ये शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. सतत रहदारी असलेल्या परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
मलकापूर येथील लाहोटीनगरजवळ स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. शाखेच्या शेजारी उपमार्गालगत असलेल्या इमारतीत याच बँकेचे काही वर्षांपूर्वी एटीएम सुरू करण्यात आले आहे. या एटीएममधून ग्राहकांना बँकेची सुविधा पुरवण्यात येते. महामार्गावरून प्रवास करणाºया प्रवाशांसह परिसरातील नागरिकही पैसे काढण्यासाठी या एटीएमचा वापर करतात. गुरुवारी नेहमीप्रमाणे कॅश भरणाºया कंत्राटदार कंपनीने एटीएम मशीनमध्ये कॅश भरणा केल्यामुळे हे मशीन सुरूच होते. गुरुवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी मशीनमधील रोकडसह मशीनच लंपास केले. ही घटना शुक्रवारी सकाळी आसपासच्या व्यावसायिकांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती तत्काळ कºहाड शहर पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्यासह कर्मचाºयांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. संबंधित एटीएम रात्री दोन वाजता बंद पडल्याची आॅनलाईन नोंद बँकेमध्ये झाली आहे. त्यामुळे दोन वाजताच चोरट्यांनी ते मशीन तेथून उचलले असावे, अशी शक्यता आहे.
पोलिसांनी ठसेतज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले होते. घटनास्थळावर दाखल झालेल्या श्वानाने एटीएमपासून उपमार्गापर्यंत माग काढला. तेथेच श्वान घुटमळले. त्यामुळे चोरटे वाहनाने पसार झाले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मलकापुरातील अनेक एटीएम मशीनला सीसीटीव्ही कॅमेरे किंवा वॉचमन नसल्यामुळे संबंधित एटीएमची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर येत आहे. 
 
सीसीटीव्ही फुटेज संकलित 
नेहमीच रहदारी असलेल्या महामार्गाकडेच्या एटीएममधून मशीनसह कॅश चोरीला जाणणे ही गंभीर बाब आहे. पोलिस सकाळपासून परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज संकलित करीत आहेत. सर्व शक्यता विचारात घेऊन विविध मार्गाने तपास सुरू केला असल्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले. 
 
मशीनला सुरक्षाच नाही
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या संबंधित एटीएमला कसलीच सुरक्षाव्यवस्था नाही. एटीएममध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. तसेच त्याठिकाणी रक्षकही नाही. एटीएमच्या मशीनचे वजन सुमारे तीनशे ते साडेतीनशे किलोपर्यंत असते. मशीन उचलण्यासाठी किमान सहा माणसांची आवशश्यकता असते. मशीन बसविताना त्याला कसलेही फाउंडेशन अथवा फिटिंग करण्यात आलेले नव्हते. मशीन केवळ जमिनीवर ठेवून त्याला कनेक्शन जोडण्यात आले होते.